कोंबड्यांमध्ये(Poultry) बऱ्याच वेळेस जंत प्रादुर्भाव आढळून येत असतो. यामध्ये विशेषतः परसबागेतील मुक्तपणे बाहेर फिरून अन्न मिळवणाऱ्या कोंबड्यांमध्ये शेडमधील कोंबड्यांपेक्षा(Poultry) जास्त प्रमाणात जंत प्रादुर्भाव (Poultry Deworming) आढळत असतो आणि जंत कोंबड्याच्या आतड्यामध्ये, इतर अवयवांमध्ये आढळत असतात. कोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटे कृमी व टेपवर्म चा प्रादुर्भाव आढळत असतो.
जंत प्रादुर्भावाची लक्षणे काय आहेत?
- जंत पचवलेले अन्न खाऊन किंवा रक्तावर जगतात आणि जंत प्रादुर्भावामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते, परंतु वाढ खुंटते, निस्तेज दिसत असतात.
- कोंबडीच्या पोटाचा खालचा भाग मोठा दिसतो आणि रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, रक्तक्षय होत असते.
- जंतप्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्त असेल तर विष्ठेमध्येही जंत दिसू लागत असतात
- कोंबड्या अशक्त होतात, हगवण लागते, वजन कमी होते, अंडी उत्पादन कमी होत असते
- तलंगा व वाढणाऱ्या कोंबड्यामध्ये मानमोडी (राणीखेत रोग) आजाराचे लसीकरण करण्यापूर्वी म्हणजेच वयाच्या ७ ते ८ आठवड्याला व १६ ते १७ व्या आठवड्याला जंतनिर्मूलन करून घ्याव लागत असते.
- सर्वसाधारणपणे गादीवरील मोठ्या कोंबड्यांमध्ये महिन्यातून एकदा तर पिंजऱ्यातील कोंबड्यांमध्ये ३ महिन्यातून एकदा जंतनिर्मूलन करावे लागते.
- जंतनिर्मूलनासाठी तज्ज्ञांच्या सल्यानुसारच पायप्रॅझीन, अलबेंन्डॅझोल, लेव्हमिसॉल, टेटरामिसॉल इत्यादी औषधी वापरली जात असतात.
- जंतनिर्मूलनादिवशी व नंतर दोन दिवस जीवनसत्त्व व इलेक्ट्रोलाईट पाण्यातून कोंबड्यांना द्यावी आणि जेणेकरून जंतनिर्मूलनाचा ताण होणार नाही.
प्रतिबंधात्मक उपाय कोणते ते पाहू या?
- शेडमध्ये(Poultry) स्वच्छता ठेवावी, पाणी सांडून होणारा ओलावा, कोंदटपणा अजिबात नसला पाहिजे.
- कोंबड्यांना भरपूर जागा, हवा व प्रकाश मिळायला हवा.
- सर्व वयोगटाच्या कोंबड्या एकमेकांत मिसळू नयेत आणि त्याऐवजी पिले व मोठ्या कोंबड्या वेगवेगळ्या ठेवण्यात याव्या.
- माशा, गोगलगाई, गांडूळ, कीटक इत्यादींचा नायनाट करावा लागत असतो.
- कोंबड्यांचे खाद्य व पाणी, विष्ठेने बाधीत होणार नाही याची काळजी घ्यावी लागत लागत असते.
- रोगी कोंबड्यांवर तात्काळ उपचार करण्यात यावा.
- कोंबड्यांना जीवनसत्वयुक्त टॉनीक आहारातून द्यायला हवे
पहिले जंतनाशन – ४ आठवडे वयाच्या कोंबड्यांना द्यावे समो दुसरे जंतनाशन – ८ आठवडे वयात तर तिसरे जंतनाशन – १२ आठवडे वयाच्या कोंबड्यांना द्याव लागत असते.
हे हि वाचा : पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन तसेच कोंबडी खाद्यामधील घटक