मेष (Aries): गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल आणि कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल आणि नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल आणि अतिरिक्त खर्च होतील. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न स्थिर राहील आणि आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा.
वृषभ (Taurus): खर्चाचे प्रमाण वाढेल आणि बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी आणि जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा आणि बोलताना संयम बाळगा, धोका पत्करू नका. उत्पन्न स्थिर राहील आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा आणि प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल आणि घरातील वयोवृद्धांचा मान राखा.
मिथुन (Gemini) : सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल आणि इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल आणि अति श्रमाचा ताण जाणवेल. व्यवसायात तेजी मिळेल आणि अधिक प्रयत्न करावे लागेल. स्वतः निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका आणि जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या आणि कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.
कर्क (Cancer) : जवळचा प्रवास चांगला होईल आणि भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल आणि नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल आणि परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा आणि जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.
सिंह (Leo) : लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो आणि कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी आणि विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे आणि मित्रपरिवारासह वेळ घालवा. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा आणि घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.
कन्या (Virgo) : मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा आणि मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका आणि पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत आणि परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे आणि काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल.
तुळ (Libra) : उगाच त्रागा करू नका आणि मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील आणि दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल आणि जोडीदाराचे प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आणि उत्पन्न वाढेल. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका आणि आई-वडिलांची साथ लाभेल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे.
वृश्चिक (Scorpio) : उगाचच चिडचिड कराल आणि कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील आणि आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका आणि तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो आणि घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.
धनु (Sagittarius) : दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल आणि कमिशन मधून मिळणार्या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल आणि वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी आणि व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस, कुठलाही निर्णय घेतला घाई करू नका आणि आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा.
मकर (Capricorn) : भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल आणि बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका आणि अकारण होणार्या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्यांची साथ मिळेल आणि जुनी व्याधी पुन्हा त्रास देण्याची शक्यता. सामाजिक कार्यात मन लागेल आणि मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता. नवीन योजना बनतील आणि कुटुंबीयांकडून सहकार्य आणि प्रेम मिळेल. वेळ अनूकूल असेल.
कुंभ (Aquarious) : कामातील उत्साह वाढवावा लागेल आणि मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा आणि प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. धर्मकार्यात मन लागेल आणि आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहिल आणि धनलाभ होण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील आणि नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. नवीन नोकरी मिळेल आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचार करा.
मीन (Pisces) : कौटुंबिक शांतता जपावी लागेल आणि जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील आणि फार विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल आणि नवीन जवाबदारी मिळेल. उत्पन्न स्थिर राहील आणि कोर्टाची काम निघतील. जवळच्या माणसाची आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि नोकरीत उच्चधिकार मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल.