आजचा  हवामान अंदाज 05-07-2022 (Today's weather forecast ) - डिजिटल शेतकरी

आजचा  हवामान अंदाज 05-07-2022 (Today’s weather forecast )

 हवामान अंदाज मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, उर्वरित राज्यात कसे राहणार चित्र

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच (Monsoon) मान्सून आपले रूप बदलत असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही मान्सूनच्या शाखा सक्रीय होत असल्याने मंगळवारपासून  मराठवाड्यात तर मेघगर्जनेसह पावसाला सुरवात होत  आहे आणि  तर कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा  हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.आधी  जूनमध्ये घडले नाही ते या महिन्यात होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंत संपूर्ण  राज्यात समप्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होत आहे. पण आता या महिन्यात किमान सरासरीप्रमाणे पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार तर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

मध्य महाराष्ट्रात  कडी होणार पाऊस

जून महिन्यात मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनने काही ठिकाणी पडला आहे. पुणे वगळता इतर जिल्ह्यामध्ये पावसाची अवकृपाच राहिलेली आहे आणि  मात्र, 5 जुलैपासून पुण्यासह सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही  तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली होती. पण आता पावसाचा जोर तर वाढणार आहेच शिवाय सर्वत्र हजेरीही लावली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे आणि  आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति  पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस हा  बरसणार आहे.

 

हे हि वाचा :मोसंबी लागवड तंत्रज्ञान 2022 

 

कोकणावर वरुणाराजाची कृपादृष्टी

राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर जास्त कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा  बरसणार आहे. तसेच  दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. सुरवातीपासूनच या विभागात पावसाने हजेरी लावल्याने यंदा केवळ कोकणात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्राला पावसाची आजून हि वाट पाहत  आहे.

 

Leave a Comment