Urea : स्वस्त युरिया(Urea) देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे तसेच युरियाच्या एका पिशवीची किंमत तीन हजार रुपये असताना, शेतकऱ्यांना तो 300 रुपयांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहे. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं आहे यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपेक्षा जास्त दराने युरिया(Urea) विकला जात आहे आणि ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेत 3 हजार रुपयांना विकली जाते, तोच युरिया आता सरकार आपल्या शेतकर्यांना 300 रुपये दराने विकत आहे. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहे. Urea
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला संबोधीत केलं आणि यावेळी त्यांनी विविध मुद्दे माडले आहे. Urea
1 thought on “Urea : पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना दिलासा; स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद”