आताची सर्वात मोठी बातमी!भीषण अपघातात विनायक मेटे यांचं निधन 2022 - डिजिटल शेतकरी

आताची सर्वात मोठी बातमी!भीषण अपघातात विनायक मेटे यांचं निधन 2022

पनवेल – अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपल्या समोर येत आहे. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. त्यांनतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  (mumbai pune expressway). मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे शिवसंग्राम पक्षाचे ते अध्यक्ष होते आणि  ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे  उपचारदरम्यान  विनायक मेटे (vinayak mete) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या अपघातामुळे मराठा आरक्षणाचं खंबीर नेतृत्व हरपलं असं म्हणता येणार आहे.

काल रात्री कार्यकर्त्यांसह विनायक मेटे बीडहून मुंबईला गेले  होते आणि त्या  दरम्यान,  मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेटे हे गंभीर जखमी झाले होते आणि  हा अपघाताची भीषणता इतकी होती की, यात फॉरच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही आणि  मात्र, जखमी अवस्थेत मेटे यांना तातडीने पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते मात्र, नंतर उपचारदरम्यान सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, खोपली बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला होता.  त्यानंतर त्यांना तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जरी अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी, गाडीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे आणि वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोगंराच्या कपारीला धडकली आणि हा अपघात घडला अशी  प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे.

 

हे हि वाचा : कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट शिवीगाळ, धमकी देत असेल तर घाबरु नका, RBI चा नवा आदेश काय आहे वाचा

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment