हवामान अंदाज सावधान ! पहा कुठे कुठे कोसळणार पुढील 3 दिवसाचा अंदाज - डिजिटल शेतकरी

हवामान अंदाज सावधान ! पहा कुठे कुठे कोसळणार पुढील 3 दिवसाचा अंदाज

मुंबई : हवामान अंदाज ( weather forecast ) बंगालच्या उपसागरापासून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद व होत असून, काही ठिकाणी मुसळधार ते  अतिवृष्टी होत आहे. हवामान अंदाज पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला गेला आहे.

हवामान अंदाज ( weather forecast ) मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते  अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे आणि  पुढील तीन दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविली  आहे.

बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम मध्य भागावरील आणि दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत ही प्रणाली आणखी जोर पकडनार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल.

हवामान अंदाज

९ ऑगस्ट

रेड अलर्ट :पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागात दिला आहे.

ऑरेंज अलर्ट : मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागात दिला आहे.

१० ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात दिला आहे.

११ ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट : पालघर, नाशिक, अकोला, अमरावती या भागात दिला आहे.

सोमवारी मुंबई आणि परिसरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिवसभरात अधूनमधून कोसळत होत्या. गेल्या आठवड्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून राज्यभरात पावसाच्या स्थितीत सातत्याने बदल होत आहे.

 

हे हि वाचा : खरीप हंगामातील अशी करा मका लागवड फायदा होईल

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment