हवामान अंदाज या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. त्यामुळे कोकणात चांगल्या तर उत्तर महाराष्ट्रात धुळे व जळगाव जिल्ह्यात हलक्या (Light Rainfall) आणि नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता (Maharashtra Rain Forecast) वर्तविली आहे आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम, मध्य व पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता (Rain Possibility In vidarbh) वर्तविली आहे. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, पुणे जिल्ह्यात (Pune Rain Update) मध्यम स्वरूपात तर इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. याप्रकारचे हवामान ३० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि या आठवड्यात देखील काही भागांत आकाश पूर्णतः ढगाळ राहणे शक्य आहे.
कोकण ः
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आज व उद्या ६० ते ६५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५-४७ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ५५-५६ मि.मी. व पालघर जिल्ह्यात ३० ते ५२ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक जिल्ह्यात आज व उद्या ४१ ते ४७ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात आज ७०-७५ मि.मी. व उद्या ३०-३३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यांत आज व उद्या १०-१२ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा ः
आज उस्मानाबाद, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत ४-६ मि.मी., लातूर व नांदेड जिल्ह्यांत ७ ते ११ मि.मी., तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ४०-४१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या धाराशिव, बीड व हिंगोली जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्य आहे.
पश्चिम विदर्भ ः
वाशीम जिल्ह्यात आज व उद्या ७-८ मि.मी. तर, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ११ ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात आज २८ मि.मी. व उद्या १४-१५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. video
मध्य विदर्भ ः
आज व उद्या नागपूर जिल्ह्यांत ७ ते ९ मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात १२ ते १४ मि.मी. व वर्धा जिल्ह्यात ९ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील आणि वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ कि.मी. राहील.
पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आज १९ ते २० मि.मी. तर उद्या १८-२१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज ९-१० मि.मी. व उद्या १७-१९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते ६ कि.मी
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र ः
आज व उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ३८ व ४४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आज १४-१६ मि.मी. व उद्या २१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. आज व उद्या सांगली, सातारा जिल्ह्यांत ६ ते ८ मि.मी. तर नगर जिल्ह्यात २-३ मि.मी. आणि ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. आज व उद्या सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे..