हवामान अंदाज महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहणार आहे. हवामान अंदाज मराठवाड्यात आजपासून पावसाचे प्रमाण कमी होईल आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड तसेच कोल्हापूर जिल्ह्यांत आज व उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान अंदाज आज महाराष्ट्रावर उत्तरेस १००० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्याची शक्यता असल्याने पावसाचा (Rain) जोर कायम राहणार. मात्र उद्या हवेचा दाब उत्तरेस १००२ व दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे. त्यामुळे बऱ्याच भागांत पावसात उघडीप राहील आणि ही स्थिती बुधवार ते शनिवार (ता.२० ते २३) या कालावधीत राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्या वेळी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
बंगालचे उपसागराचे भागावर आज व उद्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहणार आहे. बीड, परभणी, लातूर व नांदेड जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असून, उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे आणि मात्र अजूनही दुष्काळी पट्ट्यातील काही भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही.
कोकणः
आज व उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६१ ते ७२ मिमी पावसाची शक्यता आहे आणि वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज ३७ मिमी तर उद्या २४ ते ३४ मिमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७-१८ किमी व रत्नागिरी जिल्ह्यांत १४ किमी तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात १० ते १३ किमी राहील.
सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २८- ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राह्ण्याची शकता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची ७६ ते ८२ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्रः
नाशिक जिल्ह्यात आज ३३ मिमी तर उद्या २२-२४ मिमी पावसाची शक्यता आहे. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत आज ११ ते १२ मिमी व उद्या ५ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १६ ते १८ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३०-३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६८ टक्के राहील.
मराठवाडाः
नांदेड जिल्ह्यात आज व उद्या २१-२२ मिमी पावसाची, परभणी जिल्ह्यात आज ५ मिमी व उद्या १६-१७ मिमी पावसाची शक्यता आहे. उर्वरित उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत आज ५ ते ७ मिमी व उद्या ४ ते ७ मिमी इतक्या अल्प पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहनार आहे.
वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, लातूर, हिंगोली व बीड जिल्ह्यांत १६ ते १८ किमी, तर उर्वरित नांदेड, परभणी, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १४ ते १६ किमी राहील. उस्मानाबाद, लातूर, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान २९ -३१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व संभाजीनगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६१ टक्के राहील.
पश्चिम विदर्भः
अकोला व अमरावती जिल्ह्यांत आज २३ ते २९ मिमी, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १९ ते १९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या सर्वच जिल्ह्यांत ७ ते ११ मिमी पावसाची शक्यता आहे आणि वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १६-१७ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३-३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के तर दुपारची ६५ ते ७३ टक्के राहील.
मध्य विदर्भः
आज यवतमाळ जिल्ह्यात २१-२२ मिमी, वर्धा जिल्ह्यात १६ मिमी व नागपूर जिल्ह्यात ३८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या यवतमाळ जिल्ह्यात २३ मिमी, नागपूर जिल्ह्यात १२ मिमी व वर्धा जिल्ह्यात ७-८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील आणि वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ किमी राहील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७५ टक्के राहील.
पूर्व विदर्भः
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत आज ५५ मिमी पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात ३५ मिमी व चंद्रपूर जिल्ह्यात २० मिमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत ३७-३८ मिमी, तर चंद्रपूर जिल्ह्यात २३-२४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते १३ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत३०- ३२ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८-८० टक्के राहील.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्रः
कोल्हापूर जिल्ह्यात आज व उद्या ५८ ते ६५ मिमी पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत आज ३१ ते ३८ मिमी, तर उद्या १४ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यांत आज ६ ते १२ मिमी व उद्या ५ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते २० किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळच सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८६ टक्के राहील.