हवामन अंदाज राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारी पावसाने (Rain Update In Maharashtra) उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार सरी (Heavy Rain) बरसल्या आहे. मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) उद्या सकाळपर्यंत पुणे, पालघर, नाशिकसह विदर्भातील सर्वंच जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्या. संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील बहुतांश मंडळात पाऊस झाला. संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक होता आणि परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पाऊस हजेरी लावत आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारीही जोरदार सरी बरसल्या आणि तर परभणी जिल्ह्यातील काही मंडळांत मध्यम पाऊस झाला.
खानदेशातही राहून राहून पावसाच्या सरी कोसळत पाह्यला मिळत आहे. जळगाव, नंदुरभार जिल्ह्यांत पावसाचं प्रमाण तुलनेने जास्त आहे आणि धुले जिल्ह्यातही चांगला पाऊस होतय. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीवर वाढ झालेली आहे आणि वाढणारे तण, मर रोगाची भीती यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
विदर्भात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागांतील पूरस्थिती अद्याप कायम राहणार आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर अधिक होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मंडळांत पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोला जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार घडले आहेत आणि मूर्तिजापूर तालुक्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात घुसल्याने पीक व घरांचे मोठे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
तर हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत पुणे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.