दुधाळ जनावरांमध्ये दुधाचे(Animals) उत्पादन आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खनिजांची(Mineral) भूमिका महत्त्वाची असते.
दुधाळ जनावरांमध्ये (Milky Animals) दुधाचे उत्पादन (Milk Production) आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खनिजांची (mineral mixtures) भूमिका महत्त्वाची बजावत असते. जनावरांच्या शरीरामधून वेगवेगळ्या मार्गाने खनिजे(Mineral) बाहेर पडत असतात. त्यांची उणीव भरून काढण्यासाठी खनिज(Mineral) मिश्रणाची आवश्यकता असत असते. हाडांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसची मात्रा राखून ठेवण्यासाठी, रक्तात लाल पेशींच्या निर्मितीसाठी आणि पाचक रसांच्या उत्तम कार्यासाठी खनिजे हे आवश्यक आहे. जनावरांच्या खाद्यात खनिज मिश्रणाचे महत्व काय, याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आज आपण पाहूया.
जनावरांतील खनिज कमतरतेची कारणे कोणती?
- जनावरांना हिरवा आणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात दिला जात असतो; परंतु खनिज द्रव्यांकडे विशेष लक्ष दिले जात नाही.
- दुधाळ(Animals) जनावरांच्या आहारामध्ये मुख्यतः धान्य, ढेप, हिरवा व सुक्या चाऱ्याचा वापर होत असतो. ज्यामधून आवश्यकतेनुसार प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ उपलब्ध होत असतात; परंतु खनिजांची पूर्तता होऊ शकत नसते.
- काही पशुपालक जनावरांना फक्त हिरवा चारा आणि सुका चारा देत असतात.
हे हि वाचा : पावसाळ्यात जनावरांच्या आजारांची लक्षणे 2022
खनिजमिश्रण देणं का आवश्यक आहे?
- उत्तम आरोग्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या वाढीसाठी जनावरांच्या आहारात ऊर्जा आणि प्रथिनांशिवाय खनिज द्रव्यांचे व जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असणे महत्त्वाचे आहे.
- जनावरांच्या आहारामध्ये सामान्य क्रिया घडवण्यासाठी कर्बोदके, प्रथिने व क्षार जास्त प्रमाणात तर जीवनसत्त्वे व खनिजे कमी प्रमाणात लागत असतात.
- जनावरांच्या आहारामध्ये एकूण २२ खनिजांची आवश्यकता भासत असते आणि ज्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, गंधक, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोरिन ही सात प्रमुख खनिजे आहेत.
- सूक्ष्म खनिजांमध्ये मुख्यतः लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट आणि सेलेनिअम अशा १५ सूक्ष्म खनिजांचा समावेश होत असतो.

खनिज कमतरतेमुळे कोणते दुष्परिणाम होतात?
- दुधाळ जनावरांची खनिजांची गरज पूर्ण न झाल्यामुळे दूध उत्पादनावर आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतात.
- जनावरांची चयापचय क्रिया व्यवस्थित होत नसते.
- दूध उत्पादनात कमतरता आढळून येत असतात.
- जनावर माजावर येत नाही आणि माजावर आले तरी मुका माज दाखवत असते
- गर्भाशयामध्ये दोष निर्माण होण्यास सुरवात होत असते.
- दुधाळ जनावरांचा भाकड काळ वाढतो. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो
3 thoughts on “Mineral mixture: दुधाळ जनावरांना खनिजमिश्रण का द्यावे? गाई दुध कमी देते का 2022”