Weather Update :आजचा हवामान अंदाज - डिजिटल शेतकरी

Weather Update :आजचा हवामान अंदाज

Weather Update : पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

पुणे : Weather Update विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने (Rain) उघडीप दिलीली  आहे. आज पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) वर्तविली आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह, श्रावण सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली गेली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानातील कमी कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय झाला आहे. या आसाचा पश्चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकणार गेला आहे. पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीत कायम राहणार आहे. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे आणि रायलसीमा, तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

तुम्हाला हि आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील.

Weather Update

राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी सतत पडत आहेत. आज (ता. १९) पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे आणि  उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाब क्षेत्र तयार होतना दिसत आहेत. बांगलादेश आणि म्यानमार किनाऱ्यालगतच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे आणि  त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. प्रणालीची तीव्रता वाढत च चालली आहे. आज उत्तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होणार आहे आणि  ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगड कडे येण्याचे संकेत दिले आहेत. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले  आहे.

Weather Update

पहा कोठे आहे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी

गुरूवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) खालील प्रमाणे :

कोकण : दापोली, अंबरनाथ, माथेरान प्रत्येकी ५०, जव्हार, वाकवली प्रत्येकी ४०, तळा, मंडणगड, उल्हासनगर, खेड, पालघर, कल्याण, वेंगुर्ला, पोलादपूर, शहापूर, तलासरी, म्हसळा, हर्णे, कणकवली प्रत्येकी ३० २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस…

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, इगतपुरी प्रत्येकी ७०, लोणावळा, वेल्हे प्रत्येकी ४०, पेठ, सुरगाणा, जावळीमेढा, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३०२४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस..

घाटमाथा : दावडी, ताम्हिणी ८०, शिरगाव, अंबोणे, डुंगुरवाडी प्रत्येकी ७०, कोयना नवजा प्रत्येकी ६०, भिरा ५०२४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस..

हे हि वाचा : सरकारी नोकरी बंपर भरती पोस्टात तब्बल 1 लाख पदांसाठी मेगाभरती..

Leave a Comment