मुंबई : बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायींच्या (Snail) प्रादुर्भावामुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून गोगलगायींमुळे(Snail) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी सातत्याने होत होती. अखेर सरकारने तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी मदत देण्यास मान्यता दिली गेली आहे. तसेच यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक म्हणजे ९२ कोटी ९९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
यंदाच्या हंगामात राज्यात अंदाजे ४८.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची(Snail) लागवड झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. मागील(Snail) वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने लागवडीखालील क्षेत्र दोन लाख हेक्टरहून अधिक वाढले आहे आणि मात्र यंदा अतिवृष्टी आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला चांगलाच तडाखा बसला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. सरकारी यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात बसत असलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर (Snail)करण्यात येणार आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या वाढीनुसार यानुसार १३ हजार ३०० रुपयेप्रमाणे प्रति दोन आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये लातूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार असून, यात दोन हेक्टरपर्यंत बाधित ९२ हजार ६५५ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख, ८४ हजार एवढी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर बीडमधील १२ हजार ९५९ शेतकरी या निकषात बसत असून, ३८२२. ३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे… यापोटी ५ कोटी १९ लाख ८४ हजार, तर उस्मानाबादमधील(Snail) ४०३ शेतकऱ्यांना २८३. ८४ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ लाख सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे… लातूरमधील तीन हेक्टरच्या मर्यादेच्या निकषातील १२ हजार ९८५ शेतकऱ्यांच्या ८६२०.७२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ कोटी ७२ लाख, ४२ हजार रुपये जाहीर मदत देण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात १४ हजार हेक्टरपेक्षा क्षेत्र बाधित आहे, तरीही केवळ ३८२२ हेक्टर क्षेत्र बाधित दाखवले गेले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केवळ दोन कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सरकार अर्धवट माहिती समोर आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यामुळे या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून शेतकऱ्यांना जास्तीत(Snail) जास्त मदत करण्याची गरज आहे.
– धनंजय मुंडे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
हे हि वाचा :दुधाचे मोठे संकट‘या’ राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले
2 thoughts on “snail : गोगलगायीग्रस्तांना 98 कोटींची मदत जा जिल्हाचा आहे समावेश”