कांद्याचा हंगाम (Onion Season) यंदा शेतकऱ्यांची कसोटी पाहणाराच ठरताना दिसत आहे. कारण कांदा बाजारात (Onion Arrival) दाखल झाल्यापासून दर दबावात आहेत आणि केंद्र सरकारच्या मते यंदा देशातील कांदा उत्पादन (Onion Production) २० लाख टनांनी वाढून १३६ लाख ७० हजार टनांवर पोचलं आहे. त्यातच रब्बीचा माल तयार होण्यास उशीर झाल्यानं दोन हंगामातील माल एकाचवेळी बाजारात दाटला आहे. त्यामुळं उन्हाळ कांद्यालाही फार कमी दर (Onion Rate) मिळतोय. बाजारातील आवक जास्त असल्यानं दर दबावात आहेत तसेच या परिस्थितीत कांदा निर्यात होण गरजेचं आहे. आणि सरकारनं निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळं निर्यातही होत नाहीये. त्यामुळं कांदा(Onion) दरावरील दबाव कायम राहिला आहे.
श्रीलंका भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करत असतो. मात्र सध्या श्रीलंकेत आर्थिक संकट सुरु झाले आहे. त्यामुळं निर्यातही थांबलीय गेली आहे. पाकिस्तानलाही कांद्याची टंचाई जाणवत आहे मात्र दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमुळं कांदा निर्यातीबाबत अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडनेच बाजारात उतरून खरेदी करावी, अशी मागणी पुढे आली / येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री पीयूष गोयल यांना नाफेडमार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची विनंती केली गेली आहे.