SBI : च्या ४५ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे 2022 - डिजिटल शेतकरी

SBI : च्या ४५ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती, याबाबतीत सतर्क राहा अन्यथा खात्यातून जातील पैसे 2022

नवी दिल्ली – जर तुमचंही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये(SBI )खातं असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी कुठलाही मेसेज आला आहे का, जर असा मेसेज आला असेल तर सतर्क राहा आणि  जर तुम्ही तुमची माहिती शेअर केली तर तुमचं खातं रिकामी होऊ शकत आहे आणि तसेच या मेसेजप्रमाणे कृती न केल्यास खरोखरच तुमचं खातं ब्लॉक (SBI )होणार का, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पीआयबीने या व्हायरल मेसेजचं फॅक्ट चेक करून खरी माहिती समोर आणण्यात आली  आहे. त्यानुसार जर तुम्हालाही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर काय केलं पाहिजे तर ते पाहा. पीआयबीने आपल्या ऑफिशियल ट्विटमध्ये लिहिले की, एसबीआयच्या(SBI ) नावावर एक खोटा मेसेज शेअर केला जात आहे आणि  त्यामध्ये ग्राहकांना तुमचं खातं ब्लॉक होण्यापासून वाचवायचं असेल तर लवकर तुमचा पॅन क्रमांक अपडेट करा असं या  मेसेज सांगण्यात येत आहे

हे हि वाचा : लाल मिरचीच्या दरातील तेजी टिकून

हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे आणि  अशा प्रकारचा कुठलाही मेसेज किंवा मेल बँकेकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेला नाही आणि त्यामुळे तुम्हालाही असा मेसेज किंवा मेल आला असेल तर त्वरित सावध रह.

पीआयबीने सांगितले की, अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेजला उत्तर देऊ नका आणि  तसेच कुणालाही आपली खासगी माहिती शेअर करू नका. असे केल्यास तुमचं खातं रिकामी होऊ शकतं आहे तसेच जर तुम्हालाही अशा प्रकारचे खोटे मेसेज येत असतील तर report.phishing@sbi.co.in वर तक्रार करू शकता किंवा १९३० या क्रमांकावर संपर्क साधू न तक्रार नोदणी करू शकता.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment