Land | जमीन खरेदी करायची तर त्या आधी हे चेक करा नाहीतर होईल फसवणूक 2022 - डिजिटल शेतकरी

Land | जमीन खरेदी करायची तर त्या आधी हे चेक करा नाहीतर होईल फसवणूक 2022

Land | जमीन खरेदी करताना घ्यावी ‘ही’ काळजी, जाणून घ्या सविस्तर…

Land | शेतकरी किंवा उद्योजक नवीन जमिनीची खरेदी करत असतात. मात्र, अनेकदा नवीन व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी (Purchase of land) करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल बर्याच गोष्ठी माहिती नसतात. यामुळे शेतकरीची फसवणूक होऊ शकते. जमिनीची (Agriculture) खरेदी करताना मध्यस्थी लोक अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेत फसवणूक करत असतात. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक (Financial) तोटा होत आहे. चला तर मग शेतकरनो  जाणून घेऊयात जमीन (Land) खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणे करून आपली फसवणूक टाळता येऊ शकते.

Sheti kumpan yojana

सातबारा व फेरफार उतारा

शेतकऱ्यांनी जमिनीची खरेदी करताना सातबारा उतारा आणि फेरफार उतारा हा पाहावा आणि चेक करावा.जमिनीची खरेदी केल्यानंतर किंवा त्यापूर्वी सातबारा उतारा तुमच्या हातात आला की, त्यानंतर तात्काळ सदर जमीन भूधारणा पद्धतीअंतर्गत येते कि नही हे  जाणून घ्यावे. या सातबारा उताऱ्यावर भागवटादार वर्ग-1 पद्धत असेल, तर भागवटादार वर्ग-1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येत असतात आणि  अशा जमिनींवर हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात म्हणजेच शेतकरीच या जमिनीचा मालक असतो असे समजावे.

हे हि वाचा : farm road ! शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय ? 2022

जमिनीचा गट नकाशा

जमीनीची खरेदी करताना जमिनीचा गट नकाशा पाहणे फार गरजेचे असते. कारण जमिनीचा गट नकाशा पाहिल्यामुळे जमिनीची हद्द समजत असते. तसेच जमिनीची चतु:सीमा समजत असतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जमिनीच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत याची माहिती देखील मिळत असते.

शेतीचा रस्ता

सर्वात महत्त्वाची आणि जमीन खरेदी केल्यानंतरची कायमची असणारी कटकट म्हणजेच शेत जमिनीचा रस्ता होय . कारण जमिनीच्या रस्त्यावरून किती वाद होतात ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे आणि  त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीची खरेदी करण्यापूर्वी शेत रस्ता आहे की, नाही याची खात्री करणे गरजेची असते.

खरेदी खत

जमीन खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचे खरेदी खत आहे आणि  यासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी आणि त्यानंतर आवश्यक शुल्क भरून खरेदी खत करण्यात यावे. ज्यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतु:सीमा, क्षेत्र बरोबर आहे की, नाही याची सविस्तर तपासणी करून माहिती घेऊनच खरेदी खत करावे. या सर्व गोष्टींची शेतकऱ्यांनी काळजी घेऊन जमिनीची खरेदी करावी तसेच यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

7 thoughts on “Land | जमीन खरेदी करायची तर त्या आधी हे चेक करा नाहीतर होईल फसवणूक 2022”

Leave a Comment