कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस 2022 - डिजिटल शेतकरी

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस 2022

पुणे : कोकणात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत  (Heavy Rain In Konkan) आहे. मुंबईसह, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे धुमशान सुरूच आहे आणि  दमदार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर (Rainfall In Dam Catchment Area) धरल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात (Water Level) मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेलेली आहे. सततच्या पावसाने रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे आणि कुंडलिका, अंबा. सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सूर्या, जगबुडी, वाशिष्टी या नद्या दुथडी भरून वाहत आपणास पाहण्यास मिळत  आहेत. लगतच्या गावांना लोकवस्ती  सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी १५०-१६०  मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर, प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे आणि  महाबळेश्वर, लोणावळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाला काही ठिकाणी सुरूवात झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यासह, विदर्भातही ढगाळ हवामानासह हलका काही ठिकाणी  पाऊस पडत आहे.

बुधवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

 

कोकण

मुंबई शहर : कुलाबा ८४, सांताक्रुझ १९४.

पालघर : डहाणू ११६, पालघर १८३, वसई २०१

रायगड : अलिबाग १०६, कर्जत १२३, खालापूर २०१, महाड ९८, माणगाव १०५, माथेरान १६३, म्हसळा १२५,

मुरूड १४२, पनवेल १५२, पेण १९२, पोलादपूर ११९, रोहा १५५, श्रीवर्धन ९५, सुधागडपाली १५०, तळा १७७, उरण १४०.

रत्नागिरी : चिपळूण १६५, दापोली २२४, गुहागर १५३, हर्णे ११०, खेड १०९, लांजा १९१

मंडणगड १९५, राजापूर १४९, रत्नागिरी ९०, संगमेश्वर १४४, वाकवली १३८.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग १४७, कणकवली १०८, कुडाळ १०३, मुलदे (कृषी) ८३,

रामेश्वर ७५, सावंतवाडी ९२, वैभववाडी ९८.

ठाणे : अंबरनाथ १२०, भिवंडी १२०, कल्याण १३७, ठाणे १४०, उल्हासनगर ९८.

 

मध्य महाराष्ट्र

जळगाव : चाळीसगाव ३३, पाचोरा ५०.

कोल्हापूर : आजरा ६०, चंदगड ६९, गगनबावडा १५४, करवीर ४७, पन्हाळा ६०, राधानगरी ९१, शाहूवाडी ११७.

नाशिक : इगतपुरी ४५.

पुणे : चिंचवड ५४, लोणावळा कृषी १६७, पौड ४२, तळेगाव ४६, वडगाव मावळ ५७, वेल्हे ५९.

सातारा : महाबळेश्वर २१३, पाटण ५६.

 

मराठवाडा :

बीड : परळी वैजनाथ ५८.

जालना : जाफराबाद ४६, पातूर ४१.

लातूर : जळकोट ३३, निलंगा ३३.

नांदेड : मुदखेड ६३, उमरी ३१.

परभणी : पालम ४०.

विदर्भ :अमरावती : अंजनगाव ३०, धारणी ३०.

चंद्रपूर : मूल ३९.गडचिरोली : भामरागड ३०, सिरोंचा ५७.

Leave a Comment