कडेगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेली अतिविषारी घाेणस अळी(ali) रविवारी सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे आणि अंबक (ता. कडेगाव) येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय २०) या तरुणीस रविवारी शेतात काम करत असतानी दुपारी घाेणस अळीने(ali) दंश केला आहे. यामुळे तीव्र वेदना हाेऊन तिचा पाय सुजला आहे. तिला उपचारासाठी चिंचणी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले आहे.
लोकरी मावा, हुमणी आणि गोगलगाय अशा अळी व किडींच्या संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अतिविषारी अळीच्या(ali) प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहिले आहे आणि दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहेत. या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर होत आहे तसेच पिकांवर विविध प्रकारची कीड पडत आहे. काही दिवसांपूर्वी घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव समाेर आला हाेता आणि ही अळी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते. तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवरदेखील होताना दिसत आहे.
हे हि वाचा : कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात कापूस सोन्याच्या भावात विकणार
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याला घोणस अळीने(ali) दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखलकेले होते. आणखी काही ठिकाणीही घाेणस अळीच्या दंशाच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच आता हे संकट सांगली जिल्ह्यातही आल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.
जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.
1 thought on “ali: अतिविषारी घोणस अळी, शेतकऱ्यांमध्ये भीती चे वातावरण 2022”