यवतमाळ : यावर्षी सर्वत्र कापसाचे(Cotton) उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात दर वाढण्याचा अंदाज आहे आणि हीच बाब ओळखून कमी दरात कापूस(Cotton) मिळावा म्हणून गावखेड्यात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केले जात आहे.
मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात येऊ लागला आहे. गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या(Cotton) खरेदीचा शुभारंभ झाला आहे. यादिवशी ११ हजार ते १६ हजार रुपये क्विंटल पर्यंतचे दर विविध बाजारपेठेत राहिल आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस बाजारपेठेत येण्यास अजून अवधी आहे. या दोन्ही प्रांतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यातून कापूस प्रांतात लाखो हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे.

यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात हे क्षेत्र जवळपास तीन लाख हेक्टरच्या घरात गेले आहे. इतर कापूस क्षेत्राला अती पावसाने फटका बसला आहे आणि पिकांची वाढ खुंटली आहे. नंतरच्या काळात उन्हाचा तडाखा अधिक राहिला आहे. यातून कापसाची पातीगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे कापसाचे एकरी उत्पादनही घटणार, अशी स्थिती सर्वत्र दिसत आहे.
बाहेर देशातही उष्णतेची लाट आहे आणि यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये कापसाचे उत्पादन घटणार आहे. सिंध प्रांतात आलेल्या पुराने कापसाचे अर्धेअधिक क्षेत्र क्षतिग्रस्त झाले आहे तसेच यामुळे या ठिकाणच्या कापूस उत्पादनाला यावर्षी फटका बसण्याचा धोका होत आहे. यामुळे कापूस गाठी पुरविण्याचे सौदे घेणारे व्यापारी आतापासून तयारी कामाला लागले आहे.
या व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठण्यास सुरुवात केली आहे आणि खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस(Cotton) उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. १० ते ११ हजार रुपये क्विंटल दराने टाेकन शेतकऱ्यांना दिले जात आहे तसेच यामुळे येणाऱ्या हंगामात कापूस मिळविण्याचा मार्ग व्यापाऱ्यांनी मोकळा केला आहे.
खेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी असे बुकिंग करतात आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी असे बुकिंग केले नाही. यावर्षी उत्पादन नसल्याने कापसाचे दर तेज राहण्याची शक्यता जास्त राहणार आहे.
3 thoughts on “Cotton : कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; कापूस सोन्याच्या भावात विकणार 2022”