Animal Poisoning:चरायला मोकळे सोडल्यानंतर जनावर अखाद्य वस्तू आणि विषारी वनस्पती खाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि ज्वारीची कोवळी पोंगे आणि युरिया Urea खाण्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे.Animal Poisoning
जनावरांमध्ये बऱ्याच कारणांमुळे विषबाधा (Animal Poisoning) होत असते. त्यापैकी ज्वारीचे कोवळे पोंगे खाण्यात आल्याने, युरिया खाण्यामुळे, कीड-रोग नियंत्रणासाठी फवारलेली कीटकनाशके (Pesticide), तणनाशक (Weedicide), उंदीरनाशक इत्यादी घटक जनावरांनी खाल्यामुळे विषबाधा होत असते. या विषबाधेमुळे जनावरांमध्ये विविध दुष्परिणाम दिसून येत असतात. विषबाधेमुळे जनावर मृत्यू पावण्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे विषबाधेची कारणे, लक्षणांची माहिती घेऊन वेळेवर उपाययोजना करणे फार आवश्यक आहे.
युरियाची विषबाधा
ही विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते आणि युरियाची विषबाधा होऊन बऱ्याच जनावरांचा मृत्यू होत असते.Animal Poisoning
कारणे
युरियाचा पशू खाद्यामध्ये अधिक वापर यात . उदा. युरिया- मोलॅसिस, मुरघास
युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीन भरडा खाऊ घातल्यास होतो.
युरिया किंवा इतर खतांची पोती जनावरांनी चाटल्यास होते.
दुभत्या जनावरांना खुराकातून अधिक प्रमाणात युरिया Urea खाऊ घातल्यास होते. Animal Poisoning
लक्षणे
जनावरांच्या तोंडाला फेस येणे.
जनावरांना नीट उभे राहता येत नसणे.
जनावरांची पोटफुगी होते आणि पोटामध्ये वेदना होतात.
जनावरे सतत उठबस करतात आणि थोडी थोडी लघवी करतात.
जनावरांचे डोळे मोठे होत असतात आणि जनावरांना झटके येतात.
जनावरे बेशुद्ध होतात व शेवटी मृत्यू होत असतो.
अधिक प्रमाणात युरिया खाल्ला असेल, तर अर्ध्या तासामध्येच मृत्यू होत असतो.
उपचार
युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित जनावरांना २ ते ८ लिटर ताक पाजण्यात यावे.
ताक उपलब्ध नसल्यास माठातील किंवा रांजणातील थंड पाणी पाजावे आणि मोठ्या जनावरांना ४० लिटर व लहान जनावरांना २० लिटर पाणी पाजावे.Animal Poisoning
पोटातील हवा काढण्यासाठी घोड्याला घालतो तसा लगाम जनावरांच्या तोंडात घालावा आणि जेणेकरून जनावरांचे तोंड सतत उघडून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
प्रतिबंधात्मक उपाय
शेतात पेरणी सुरू असताना खतांची पोती उघडी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि पोत्याचे तोंड व्यवस्थित बांधून घ्यावे.
मोकळी सोडलेली जनावरे खत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि पशुखाद्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात युरियाचा वापर करू नये.
पशुखाद्य पोती आणि खताची पोती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत आणि युरियाची प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीनची पेंड किंवा सोयाबीनचा भरडा जनावरांना खाऊ घालू नये.
ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा
या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असेही म्हणत असतात.
कारणे
ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो आणि जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करत असते.
लक्षणे
जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होऊ शकत आहे.
कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट फुगते, जनावर अस्वस्थ होत असते.
श्वासोच्छ्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात आणि श्वसनाला त्रास होतो तसेच जनावरे थरथर कापते.
उपचार
जनावरांचे पोट फुगलेले असते आणि त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.
प्रतिबंधात्मक उपाय
जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेतेत वाया गेले असेल, तर असे पोंगे उन्हात वाळविल्यानंतरच खाऊ घालावेत कारण उन्हात वाळविल्यानंतर त्यातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.
ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेताला पुन्हा पाणी देतात आणि त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे फुटतात. अशा शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडू नका.