सकाळी लवकर उठण्यासाठी 5 उपाय पहा - डिजिटल शेतकरी

सकाळी लवकर उठण्यासाठी 5 उपाय पहा

सकाळी लवकर उठण्यासाठी 5 उपाय, जाग येईल लवकर- झोपही होईल पूर्ण-वाटेल फ्रेश

(5 solutions to wake up early in the morning, wake up early – sleep well – feel fresh )

पावसाळी हवेमुळे वातावरणात आलेला गारवा किंवा हिवाळ्याच्या दिवसांतला थंडीचा कडाका आणि  हे दोन्ही ऋतू असे आहेत की त्या काळात सकाळी लवकर उठावसंच (Can’t wake up early in the morning) वाटतच  नाही. वातावरणात इतका मस्त गारठा असतो की पांघरूण आणखी लपेटून घ्यावं आणि आणखी थोडा वेळ झोपावं असं प्रतेकाला वाटतं असते. सकाळचा आलार्म वाजताच अगदी झोपेतही आपली चिडचिड होते आणि त्याचा रागात आपण तो खाड्कन बंद करून टाकत असतो. कारण एकतर उठावंच वाटत नाही आणि उठलं तरी अंगातली सुस्ती काही जात  दिसत नाही. (how to wakeup early in the morning with a fresh mood)

थोड्याबहुत फरकाने हा अनुभव जवळपास सगळ्यांनीच घेतलेला आहे. ज्यांना सकाळी फार काही गडबड नसते, ते असं निद्रासुख घेऊ शकत आहे. पण ज्यांना कामाला पळायचं असतं, त्यांना मात्र चडफडतच का होईना, पण उठावं लागत असते. सकाळी स्वत:वरच अशी चिडचिड झाली आणि झोप पुर्ण झाली नाही तर मग सगळा दिवसच बोअर जात असतो. म्हणूनच हे काही उपाय करून बघा आणि  झोप पुर्ण होईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल आणि   अंगातली सगळी सुस्ती निघून जाईल.

सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटण्यासाठी..

 ( To feel fresh after waking up in the morning.. )

१. रात्रीचं जेवण

रात्रीचं जेवण तुम्ही कधी घेत आहात, यावर तुमची झोप खूप जास्त अवलंबून म्हत्वाची  असते. रात्री उशिरा जेवणाची सवय असेल तर त्याचा झोपेवर निश्चितच परिणाम होत असतो आणि जेवढं उशिरा जेवाल तेवढं उशिरा त्याचं पचन सुरू होतं. त्यामुळे रात्री बराच वेळ अस्वस्थ वाटतं आणि शांत झोप लागत नाही म्हणून  रात्री उशिराने शांत झोप लागते आणि मग लगेच पहाटे उठण्याची वेळ होत असते. त्यामुळे शक्यतो रात्रीचं जेवण ८ वाजेच्या आधी झालंच पाहिजे, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

२. पाय स्वच्छ धुवा

रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवा आणि  उन्हाळा असेल तर थंड पाणी वापरा आणि पावसाळा- हिवाळा असेल तर कोमट पाणी वापरले जावे. यामुळे पाय तर स्वच्छ होतीलच पण तळपायांत असणाऱ्या नस मोकळ्या झाल्याने सगळा थकवा दुर झाल्यासारखा वाटेल आणि लगेच शांत झोप लागत असते.

३. तळपायांना मसाज

तळपायांचा आणि मन शांत होण्याचा, रिलॅक्स होण्याचा खूप जवळचा संबंध असतो. त्यामुळे मन शांत करण्यासाठी पाय धुतल्यानंतर अंथरुणावर बसूनच तळपायांना ३ ते ४ मिनिटे मसाज करत राहा. मसाज करण्यासाठी साध्या खोबरेल तेलाचा वापर केला तरी चागला. यामुळे डोकंही शांत होईल आणि रिलॅक्स वाटेल आणि  या क्रियेला पादअभ्यंगम असे म्हणतात.

४. दिर्घश्वसन

झोपण्याआधी तुमच्या बेडवर बसूनच ५ मिनिटांसाठी दिर्घ श्वसन करणे गरजेचे आहे. दिर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा आणि  श्वासासोबत आपण मनातले सगळे नकारात्मक विचार, अशांतता, ताण शरीराबाहेर टाकून देत आहोत, असा विचार करत रहा. यामुळे मन शांत होईल, तणाव दूर होईल आणि शांत- पुरेशी झोप लागणार आहे.

५. फोनचा वापर

रात्री बेडवर गेल्यानंतर अनेकांना मोबाईल बघण्याची सवय असते आणि  ही सवय झोपेचं नुकसान करणारी आहे. यामुळे रात्री शांत झोप लागत नाही आणि त्यामुळे सकाळी फ्रेश जाग येत नसते. त्यामुळे रात्री बेडरुममध्ये गेल्यावर मोबाईल बघणं स्ट्रिक्टली बंद कराच.

1 thought on “सकाळी लवकर उठण्यासाठी 5 उपाय पहा”

Leave a Comment