Clinical Mastitis: दुधाळ जनावरांतील दगडी काय असते 2023 - डिजिटल शेतकरी

Clinical Mastitis: दुधाळ जनावरांतील दगडी काय असते 2023

Clinical Mastitis: दुधाळ जनावरांतील दगडी  पावसाळा (Rainy Season) सुरु झाला कि वातावरणातील जीवजंतूचे प्रमाण देखील जास्त वाढायला लागते. सूक्ष्मजंतूच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्याने जनावरांना अनेक रोगांची लागण होत आहे. यापैकीच एक म्हणजे दगडी आहे आणि दगडी हा कासेचा आजार (Mastitis) असून, या आजारात दुधाळ जनावरांची कास दगडासारखी टणक होते, म्हणून तिला आपण दगडी असे म्हणत असतो.

जनावरांमध्ये दिसून येणारा कासदाह हा दोन प्रकारचा दिसत  असतो. एक सुप्त प्रकारचा आणि  दुसरा क्लिनिकल कासदाह (Clinical Mastitis). सुप्तावस्थेतील कासदाहमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे हे दिसत नसतात. या प्रकारामध्ये जनावरांचे दूध उत्पादन हळू हळू कमी होत जात असते. या प्रकारातला कासदाह पशुपालकांच्या लवकर लक्षात येत नाही.

हे हि वाचा :पावसाळ्यात जनावरांच्या आजारांची लक्षणे 2022

 हे हि वाचा : लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण 2022

 

कासदाह आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय काय आहे

क्लिनिकल कासदाहमध्ये जनावरांच्या कासेचा आकार आणि दुधाचा रंग या दोन्हीमध्ये बदल होत असतो. क्लिनिकल कासदाहचे तीव्रतेनुसार तीन प्रकार येत असतात. जसे कि, मोडरेट, सीव्हिअर आणि तिसरा तीव्र प्रकारचा कासदाह आजार आढळतो.

जनावरांमध्ये का होत असतो  कासदाह?

  • माँडरेट (moderate) कासदाहमध्ये कासेतून बाहेर येणाऱ्या दुधाची प्रत खालावलेली दिसून येत असते. कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशी फुटल्याने दुधामध्ये गाठी येत असतात. दुधाचा रंग बदलून तो लालसर (red) रंगाचा होत जातो.
  • सिव्हीअरमध्ये कासेला सूज येत असते आणि  कासेचे तापमान वाढते. कासेला सूज आल्याने, आकार वेडावाकडा होत असतो. बाधित सडाचा आकार मोठा होतो आणि  पूर्ण कासेला सूज आलेली असल्यास संपूर्ण कास मोठी होत जाते.
  • शेवटच्या प्रकारात जनावर पूर्णपणे आजारी पडत असते आणि  तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. त्यांना उठताना, बसताना तसेच चालताना त्रास जास्त होतो.
  • कासदाह या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांची आणि गोठ्याची दैनंदिन स्वच्छता अत्यंत महत्त्वाची गरजेची  आहे. धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यानंतर कास स्वच्छ, धुऊन कोरडी करणे आवश्यक महत्वाची आहे. कास धुण्यासाठी पोटॉशियम परमॅगनेटचा वापर करावा आणि  १५-१६  दिवसांच्या अंतराने किंवा दर महिन्याला जनावरांची कलिफोर्निया मस्टास्टीस चाचणी करावी. सध्या बाजारात टीट डीप मिळते, धार काढल्यानंतर त्याचा वापर केल्यास, चांगला फायदा दिसून येत आहे.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

Leave a Comment