प्रस्तावना -( Nisigandha a flower ) निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून, त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येत असते व हे पिक राज्यात उत्कृष्ट रित्या उत्पादन देत आहे. निशिगंध ची फुले हारामध्ये वापरली जात असतात. शिवाय विविध प्रकारच्या पुष्परचनेमध्ये देखील या फुलांचे वेगळे स्थान असते. निशिगंध यामध्ये सिंगल व डबल याप्रमाणे फुलांतील पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे प्रकार पडत असतात. सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात व त्यांचा वापर हारांमध्ये व गजऱ्यांमध्ये केला जात असतो. निशिगंध डबल प्रकारच्या निशिगंधाच्या फुलदांड्याचा वापर पुष्परचनेमध्ये व बुकेमध्ये केला जात आहे. या फुलांचा वापर सुगंधी द्रव्ये निर्माण करण्यासाठी देखील केला जात असतो.
जमीन व हवामान
निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात करता येत असते. यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवत असते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात व झाड मरत असते. त्यामुळे दलदलीची व निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडू नका.
अभिवृद्धीचा प्रकार
निशिगंधाची लागवड कंदापासून करत असतात. एका कंदापासून दुसऱ्यावर्षी ५ ते ६ कंद विकसित होत असतात. त्यातील प्रत्येक कंद मुख्य कंदापासून विलग (वेगळा) करून त्याची लागवड करतात आणि निशिगंधाची लागवड एप्रिल, मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करत असतात.
लागवड
निशिगंधाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफ्यामुळे किंवा सरी-वरंब्यावर केली जात असते आणि हलकी ते मध्यम व उत्तम निचऱ्याची असेल तर ३ मी. X २ मी. आकारमानाच्या सपाट वाफ्यात ३० X २० सें.मी. अंतरावर ४ ते ५ सें.मी. खोल लागवड केली जात असते. जमीन जर काही कसदार असेल तर ४५ X ३० सें.मी. अंतरावर वरंब्याच्या मध्यभागी ५ ते ६ सें.मी. खोल कंदाची लागवड केली जात असते. निशिगंधाचे हेक्टरी १ लाख ते १.५ लाख कंद लागतात आणि लागवड पूर्ण झाल्यावर ताबडतोब पाणी द्यावे.
लागवड पूर्व तयारी
ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करावयाची आहे ती जमीन मार्च एप्रिल महिन्यात खोल नांगरून घावी. त्यानंतर दोन ते तीन वेळा फणणी करून धसकटे, हरळीच्या कशा वेचाव्यात व जमीन स्वच्छ व भुसभुशीत करून घावी. त्यानंतर हेक्टरी २६ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे व हेक्टरी ७५ किलो नत्र, ३००-३५० किलो स्फुरद, व ३०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीत मिसळून द्यावे. वरील सर्व सेंद्रिय व रासायनिक खते जमिनीत चांगले मिसळून घ्यावीत व नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे अथवा सऱ्या पाडून रान बांधणी करून घावी.
खते
लागवडीनंतर ४५ ते ४७ दिवसांनी हेक्टरी ६५ किलो नत्र व ९० दिवसांनी ६०-३५ किलो नत्र द्यावे. निशिगंधास प्रति वर्षी २०० किलो नत्र, ३०० किलो स्फुरद व ३०० किलो पालाश याप्रमाणे खते आवश्यक असते.
पाणी
निशिगंधाच्या पिकास हंगामनिहाय व जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांनी पानाच्या पाळ्या घालून घाव्या. निशिगंधास तुषार सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केल्यास उत्पादनास चांगली वाढ होत असते .
आंतरमशागत
निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्याने वेळचे वेळी गवताची खुरपणी करून लागवडीचे क्षेत्र स्वच्छ व भुसभुशीत ठेवणे आवश्यक असते. सरी वरंब्यावरील लागवडीमध्ये जर वारंवार पाणी दिल्याने कंद उघडे पडू लागले तर दर ३ महिन्यांनी पिकाची खांदणी करून मातीचा भर देणे आवश्यक असते आणि प्रत्येक खांदणीच्या वेळी खते दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होत असते.
पीक संरक्षण
निशिगंधास मावा, फुलकिडे व अळी या किडींचा व फुलदांड्याची कुज व पानांवरील ठिपक्या रोगांचा मुख्यत्वेकरुन पावसाळी प्रादुर्भाव दिसून येत असतात. त्यासाठी पुढीलप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची / बुरशीनाशकाची फवारणी करून घावी.
अ. क्र. | कीटकनाशक / बुरशीनाशक | पाण्यातील प्रमाण प्रती १० लिटर | किडी / रोग |
१. | मोनोक्रोटोफॉस ३६%
प्रवाही फॉस्फोमिडॉन ८५% प्रवाही डायमेथोएट ३०% प्रवाही |
१५ मिली
१० मिली १० मिली |
मावा व फुलकिडे |
२. | एन्डोसल्फान ३५% प्रवाही | २० मिली | अळी |
३. | डायथेन एम-४५
कार्बनडेझिम ५०% पाण्यात विरघळणारी पावडर |
२० ग्रॅम २० ग्रॅम |
फुल- दांड्यातील
कुज व पानावरील ठिपके |
जाती
डबल :- सुहासिनी |
सिंगल :- शृंगार |
सिंगल :- रजत, रेखा |
व्हेरीगेटेड :- सुवर्ण रेखा |
उत्पादन
निशिगंधापासून प्रति हेक्टर प्रतिवर्ष ५-५५ किव्ठल (५ मी. टन) सुटी फुले अथवा सुमारे २.५ लाख फुलदांडे याप्रमाणे उत्पादन मिळत असते.
हे लक्षात ठेवा
कंदाची लागवड हलक्या जमिनीत १५ ते १७.५ से. मी. व भारी जमिनीत १० ते १२ से. मी. खोल करावी लागते.
लागवडीनंतर ५० ते ९० दिवसांनी नत्र युक्त खते दिल्यास झाडांची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळत असते.
कंदाची उगवण सुरु असताना जास्त पाणी कमी देणे.
हे हि वाचा :शेवंती लागवड फुल शेती
हे हि वाचा : ऍस्टर फुल लागवड
1 thought on “निशिगंध एक फायद्याची फुलाची शेती 2022 ( Nisigandha a flower )”