गुगलने नुकतेच 13 अॅप्स Play Store वरून हटविले गेले आहेत. हे अॅप्स 20 मिलियन पेक्षाही अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत आणि या अॅप्समध्ये त्रुटी आढळून आल्याने ते प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. या अॅप्समुळे फोनची बॅटरी लवकर संपते याशिवाय हे अॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. तसेच याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अॅप्समध्ये आढळून आल्या आहेत.
McAfee Mobile Research Team च्या रिसर्चरने या अॅप्स संदर्भात रिपोर्ट केले होते आणि यावर अॅक्शन घेत गूगलने या मलेशिअस अॅप्सना गूगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. हे अॅप्स बॅकग्राउंडमध्ये सातत्याने रन करत होते Play Store आणि फसवणूक करण्यासाठीही फार वापरले जात होते. जर आपणही आपल्या अॅन्ड्रॉइड फोनमध्ये हे अॅप्स इंस्टॉल केले असतील तर आपणही हे अॅप्स डिलीट करायला हवे आहेत.
अशा फ्रॉड मलेशिअस अॅप्ससंदर्भात वेळोवेळी इशारे दिले जात असतात आणि हे Play Store अॅप्स युजर्सच्या डेटाची चोरी करत असतात. एवढेच नाही, तर याशिवाय, अनेक फायनांशिअल फ्रॉड अॅक्टिव्हिटीही करत असतात.
त्वरित डिलीट करा हे अॅप्स –
जर आपण High Speed Camera, SmartTask, Flashlight+, Memo calendar, English-Korean Dictionary, BusanBus, Quick Notes, Smart Currency Converter, Joycode, EzDica, Instagram Profile Downloader, Ez Notes या Image Vault – Hide Images हे अॅप्स डाउनलोड केले असतील, तर ते त्वरित आपल्या फोनमधून डिलीट करण्यात यावे.
1 thought on “Google ने Play Store वरून हटवले ‘हे’ 13 ‘खतरनाक अॅप्स’, आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा”