आजचे राशिभविष्य ( HOROSCOPE ) 02-08-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य ( HOROSCOPE ) 02-08-2022

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

 मेष (Aries):आजचे राशिभविष्य उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल आणि  प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल आणि हौस भागवणे शक्य होईल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या आणि नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका आणि मित्रांच्या मदतीने आणि सहकार्याने महत्त्वाचे कामे मार्गी लागतील. दिवसभर थोडा ताण राहिल आणि धोका पत्करण्याची वेळ येईल. कामानिमित्ताने बाहेर पडावे लागेल.

वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य मानसिक आंदोलनाला आवर घालावी आणि मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका आणि काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत आणि आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.

मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्यविशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल आणि कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल आणि भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल आणि आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या आणि घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. आरोग्य चांगले राहिल आणि सुधरेल आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) : आजचे राशिभविष्यगैरसमजुतीतून त्रास संभवतो आणि डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा आणि बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा आणि परिवारातील मंडळींची साथ लाभेल आणि व्यवहार करताना काळजी घ्या. ठरवलेली कामे वेळेत होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि व्यवसायात योग्य निर्णय घ्या.

सिंह (Leo) :  आजचे राशिभविष्य आर्थिक लाभावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल आणि मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा आणि आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल आणि केलेल्या कामामुळे घरात आणि समाजात टीका होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आणि व्यापार्‍यात स्थैर्य प्राप्त होईल.

कन्या (Virgo) :  आजचे राशिभविष्य  फार विचार करत बसू नका आणि खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका आणि फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल. आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे आणि कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल आणि आई-वडिलांची साथ लाभेल. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे आणि आज जास्त धावपळ होईल. थांबलेले व्यवहार पूर्ण होतील.

तुळ (Libra) : आजचे राशिभविष्य कष्टाला मागेपुढे पाहू नका आणि कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका आणि खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या आणि प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल आणि नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

वृश्‍चिक (Scorpio) : बौद्धिक कामात सक्रिय राहाल आणि धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते आणि प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल आणि आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा आणि कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. खूप पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल.

धनु (Sagittarius) : आजचे राशिभविष्य जवळच्या प्रवासात काळजी घ्या आणि भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात आणि करमणुकीत अधिक वेळ घालवाल. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल आणि मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल. घरासंबंधी केलेली दगदग कामी येईल आणि जुने मित्र भेटतील आणि दिवस चांगला जाईल.

मकर (Capricorn) : आजचे राशिभविष्य नवीन कामात सावधानता बाळगा आणि कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल आणि आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल. घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे आणि आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा आणि कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. आयुष्यात सुख समृद्धि वाढेल आणि मित्रांसोबत बाहेर जाण्याचे नियोजन होईल.

कुंभ (Aquarious) : आजचे राशिभविष्य आपलेच म्हणणे खरे कराल आणि अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील आणि किरकोळ दुखापत संभवते. आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे आणि प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा आणि नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि नव्या योजना ठरतील. मनापासून मेहनत केल्यास नक्की यश मिळेल आणि आळस टाळा.

मीन (Pisces) : आजचे राशिभविष्य कमी श्रमातून चांगला लाभ होईल आणि वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल आणि महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल. आज पैशांची भरभराट होईल.तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल आणि तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल आणि जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा. आज मन प्रसन्न राहिल आणि नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल.

हे हि वाचा : सतत मनात विचार येतात चिडचिड होती तर हे ४ उपाय पहा

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment