आजचे राशिभविष्य( HOROSCOPE) 05-09-2022 - डिजिटल शेतकरी

आजचे राशिभविष्य( HOROSCOPE) 05-09-2022

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

HOROSCOPE

मेष (Aries): आजचे राशिभविष्य आजचे राशिभविष्य गुंतवणूक सावधानतेने करावी आणि देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे आणि महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा आणि घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा आणि आई-वडिलांची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीकडून आज पैसे मिळतील.

वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य बोलतांना इतरांची मने दुखवू नका आणि वर्तमान काळाचा जास्त विचार करावा. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल आणि आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे आणि त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. तुम्हाला नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्य कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे आणि कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी आणि क्रोधवृत्तीत वाढ होईल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत आणि प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या आणि नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल आणि आज तुम्ही आणि तुमचे भावंडे बाहेर फिरायला जाल.

कर्क (Cancer) : आजचे राशिभविष्य विरोधाला सामोरे जावे लागू शकते आणि मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे. अनावश्यक खर्च त्रस्त करू शकतो आणि मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल आणि आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या आणि घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

सिंह (Leo) : स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा आणि प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा आणि कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा आणि मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा आणि परिवारातील काही मंडळींची दुःखाच्या आणि गरजेच्या वेळी साथ लाभेल.

कन्या (Virgo) : आजचे राशिभविष्य दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवा आणि अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल. वेळ हातची जाऊ देऊ नका आणि ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल आणि आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि घरातील मंडळींकडून आणि शेजारच्या काही लोकांकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

तुळ (Libra) : फार रोखठोक भूमिका घेऊ नका आणि कधीतरी सामंजस्याने परिस्थिती हाताळा. उगाच घुसमट होऊ देऊ नका आणि झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल आणि आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल आणि प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. प्रेमळ स्वभाव असणाऱ्या तुमच्या आई-वडिलांची आज साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : आर्थिक गणित जमून येईल आणि जुनी गुंतवणूक कमी येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक कराल आणि आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका आणि किरकोळ कारणावरून घरात भांडणे होण्याची शक्यता आहे आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा आणि मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

धनु (Sagittarius) : मनातील धैर्य वाढवावे लागेल आणि आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. कार्यालयीन वातावरण उत्तम राहील आणि मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. महत्त्वाच्या गोष्टीकडे आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका आणि प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामात हलगर्जीपणा नको.

मकर (Capricorn) : अचानक आलेल्या संधीचे सोने करावे आणि काही जुगारी निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या विस्ताराचा विचार कराल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते आणि खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या आणि प्रिय व्यक्तीशी आदराने आणि संयमाने वागा.

कुंभ (Aquarious) : बोलतांना धीर राखावा आणि फसव्या मित्रांपासून सावध राहावे. मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. आत्मविश्वास कायम ठेवावा. आज पैशांची भरभराट होईल आणि तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल आणि प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल.

मीन (Pisces) : चिकाटी सोडून चालणार नाही आणि इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रयत्नशील राहावे आणि अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे आणि आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या आणि आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा तुमचे कामे संयमाने पूर्ण करा.

हे हि वाचा : कोंबड्यातील जंत निर्मूलन कसे कराल उपाय योजना कसे कराल कोंबड्याची निगा कशी राखाल

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment