Insurance Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना - डिजिटल शेतकरी

Insurance Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Insurance Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे तसेच  पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात,सर्पदंश,विंचूदंश,विजेचा शॉक बसणे,रस्त्यावरील अपघात,वाहन अपघात,तसेच अन्य कोणत्याची कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो.किंवा काही शेतकऱ्यांना या अपघातामुळे अपंगत्व येत असते. परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती खालवत असते. आणि  अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात  शासनाने केली गेली आहे.Insurance Scheme

गोपीनाथ मुंडे ( Insurance Scheme )शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण २ जणांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे ते पाहू या

  1. Insurance Scheme: शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा अपघात होतो परिणामी त्यांचा मृत्यू होत असतो  किंवा त्यांना अपंगत्व येत असते.परिणामी त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असते. या सर्व गोष्टींचा विचार करून अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सुरुवात केली आहे. जेणेकरून कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही.
  2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु केली  आहे.
  3. या योजनेत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम अत्यंत कमी करण्यात आली  आहे.
  4. या योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम ३२.२३ रुपये आहे जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीत भरण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नसते.
  5. या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य DBT च्या साहाय्याने लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जात असते.
  6. महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील आधार कार्ड नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही १ सदस्य त्यामध्ये आई वडील,लाभार्थीचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही १ व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.Insurance Scheme

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ खालील प्रमाणे

  • एखाद्या शेतकऱ्याचा शेतीची कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी झाल्यास रुपये २ लाख रक्कम नुकसान भरपाई मिळत असते.
  • शेतीची कामे करताना अपघात झाल्यास अपघातामुळे १ डोळा व १ अवयव निकामी झाल्यास रुपये १ लाख नुकसान भरपाई देण्यात येत असते.
  • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरत असते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील या साठी असते.
  • शेतीची कामे करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकार कडून २ लाखांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाला देण्यात येते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही त्याची काजळी घेत असते.
  • शेतीची कामे करताना शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून १ लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी पहा

  1. फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
  2. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही.
  3. फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  4. अर्जदाराने शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर तो शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा पात्र नसेल.
  5. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी  १८ ते ७५ वर्ष दरम्यान पाहिजे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाती कारणे खालील प्रमाणे

  1. अंगावर वीज पडून मृत्यू होणे,नैसर्गिक आपत्ती ,पूर,सर्पदंश ,विंचू दंश ,वाहन अपघात,रस्त्यावरील अपघात ,विजेचा शॉक लागून मृत्यू ,रेल्वे अपघात ,पाण्यात बुडून मृत्यू ,जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा,खून,उंचावरून पडून झालेला अपघात,नक्षलवाद्यांकडून हत्या,हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू  झाल्यास किंवा जखमी  असणे दंगल हे कारणे आहे.
  2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास कोणते कारणे आहे कि लाभ घेता येणार नही.
  3. नैसर्गिक मृत्यू ,विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व ,आत्महत्येचा प्रयत्न,आत्महत्या,स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे,गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात,अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात,भ्रमिष्टपणा,बाळंतपणातील मृत्यू ,शरीरांतर्गत रक्तस्त्राव,मोटार शर्यतीतील अपघात,युद्ध,सैन्यातील नोकरी जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून या कारणामुळे लाभ घेता येणार नही.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आवश्यक कागदपत्रे पहा खालील प्रमाणे

  • दावा अर्ज असणे आवश्यक आहे.
  • ७/१२ असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • बँकेचे नाव असणे आवश्यक आहे.
  • बचत खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • शिधापत्रिका
  • एफ आय आर
  • एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल सादर करणे
  • अकस्मात मृत्यूची खबर
  • इंनक्वेस्ट पंचनामा
  • वाहन चालविण्याचा वैध परवाना
  • मृत्यू दाखला
  • अपंगत्वाचा दाखला
  • घोषणापत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल) असणे आवश्क
  • अपघात घटनास्थळ पंचनामा
  • पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
  • वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • कृषी अधिकारी पत्र
  • औषधोपचाराचे कागदपत्र
  • डिस्चार्ज कार्

हे हि वाचा : आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Insurance Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना”

Leave a Comment