कदंब एक औषधी वनस्पती( kadamba a herb ) 2023 - डिजिटल शेतकरी

कदंब एक औषधी वनस्पती( kadamba a herb ) 2023

kadamba a herb : औषधी या वृक्षाची साल, पाने व फुले यांचे विविध औषधी उपयोग महत्व  आहेत. याची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक आहे. पित्त, दाह, ताप व खोकला झाल्यास सालीचा वापर करत असतात. व्रण (अल्सर), जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून लावतात. अपचन आणि ज्वर झाल्यास फळे उपयोगी पडत असतात. या वनस्पतीत सिंकोटॅनिक आम्ल असते उप उक्त अशी हि वनस्पती.कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व महत्वाचा  मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओलॅमार्किया कदंब असून अनेक ठिकाणी याची लागवड मुद्दाम केली जाते. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार व भारत या देशांत हा आढळत असतो. भारतात कोकण, कर्नाटक, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी हे वृक्ष मोठ्या संख्येने आढळून येत असतात. कदंबाचे खोड सरळ व १३ -२१ मी. उंच असते. घेर १.९ -४.५ मी. असतो. फांद्या लांब व जमिनीला समांतर पसरलेल्या असतात, हे या झाडाचे वैशिष्टय मानल आहे. कोवळे भाग लवदार; पाने साधी, समोरासमोर, मोठी, ३०-३५  सेंमी. लांब आणि १५-२०  सेंमी. रुंद, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती, वरून चकचकीत तर खालून लवदार असतात. फुलोरे गोल, एकेकटे व अग्रस्थ आहे .फुले नारिंगी, लहान व सुवासिक असतात आणि  पिकलेले फळ पिवळे व लहान संत्र्याएवढे असते. नारिंगी व मांसल पुष्पासनावर बोंडे गर्दीने रचलेली आणि अल्पबीजी आहेत. बिया लहान व खरबरीत असते.

हे हि वाचा : कोरफड एक औषधी वनस्पती 2022

हे हि वाचा :अडुळसा वनस्पती

kadamba a herb  कदंबाची फळे खाण्याजोगी असली, तरी चवदार नाही. त्याचे लाकूड मजबूत व नरम असून कापण्यास, रंधण्यास सोपे जाते असते. मात्र लाकूड फारसे टिकाऊ नसते ती कडक नसते. होड्या, खोकी, तक्ते, फळ्या, आगपेट्या व काड्या, कागद, सजावटी सामान, चहाच्या पेट्या, कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी या लाकडाचा वापर जास्त प्रमाणात करतात.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

Leave a Comment