animals : उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या शेतकरी मित्रांनो 2022 - डिजिटल शेतकरी

animals : उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या शेतकरी मित्रांनो 2022

सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही(animals)खूप त्रास होतो आहे.  उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, तसेच म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे जनावरांच्या(animals) दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान सावली मानवते. जर जनावरे(animals) सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील तर त्याच्या आरोग्यावर परिणाम  लगेच दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते,पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते, दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे जास्त बहुधा  कल असतो. तसेच उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत चाले आहे.

प्रजननाची क्रिया ही जनावरांच्या(animals) इतर सर्व शरीरक्रियांवर अवलंबून आहे . उन्हाळ्यात जनावरांना(animals) अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होत असतो. त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होत असते . मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे(animals) माजावर येण्याचे थांबते राहत नाही .

उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होत असते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न राहण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत याची काळजी घेणे. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर  खुपदा अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे(animals) उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन होऊ  शकत नाहीत. या काळात जनावरे(animals) सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ व टंड  पाणी देणे इ. उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.

म्हशीचे व्यवस्थापन कसे करावे

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होत असतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी होत  असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्‍यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होत आहे . याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येत असते.

माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी प्रती ची  असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे पाहावे. कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्‍यतो सकाळ अथवा संध्याकाळीच  करावे. म्हशींना डुंबण्यास पाणी  द्यावे, ही त्यांची नैसर्गिक आवड आहे, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते. म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना थंड  पाण्याने धुवावे.

दुपारच्या वेळी जनावरे(animals) गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे खूप  गरजेचे आहे. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे खूप आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवरत राहावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्‍यक आहे, शक्‍य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे, अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते व त्रास कमी होऊ शकतो.

जनावरांचे व्यवस्थापन कसे ठेवावे!

जनावरांना(animals) दिवसातून किमान एकदा तरी खरारा करावा, खराऱ्यासाठी नारळाच्या काथ्याचा किवा ब्रश चा  वापर करावा. खरारा करतेवेळी तो सोयीचा व हळुवारपणे बरे वाटेल असा  करावा. त्यामुळे जनावरास थोडे तरतरीत वाटते व अंगावरील गोचीड व मरकट केस गळून पडतात व शरीर स्वच्छ राहणास मदत होते.

चारा व पाण्याचे व्यवस्थापना

 संबंधी माहिती जाणून घ्या!

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन किवा  चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी   व लागेल तशी टाकावी. चारा तसाच टाकला तर 33/ ३५  टक्के वाया जातो, कुट्टी करून दिल्यास केवळ दोन टक्के वाया जातो. कुट्टी केलेला चारा टोपल्यात किंवा लाकडाच्या गव्हाणीत टाकून खायला द्यावा. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करून कुटी करावी. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठ,पिटाचे  किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे(animals) आवडीने चारा खातात.

चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये कडुनिंब, अंजन, वड, पिंपळ, शेवरी इत्यादी झाडांची ओली पाने, हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा योग्य प्रमाणात वापर करणे शक्य आहे. अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील कीव हौद मधील  पाणी पाजावे. दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी  टप्याने चार ते पाच वेळा पाणी पाजावे.

जनावरांच्या(animals) आरोग्याची काळजी

अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचउन घावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे द्यावी . गाभण जनावरे व दूध उत्पादक जनावराची विशेष काळजी घेण्यात यावी. गोठा व परिसर स्वच्छ असावा, मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट करण्यात यावी.

जनावरांच्या सुदृढतेसाठी लसीकरण

आपल्या जनावरांना(animals) रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील त्याची काळ्ज घ्यावी . त्यासाठी मोठ्या जनावरांतील रोगनिहाय लसीकरण आणि लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याविषयी आपल्याला माहिती असणे फार  गरजेचे आहे.

लाळ्या खुरकूत या रोगाविषयी शेतकऱ्यांना काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे यामध्येहा रोग साधारणत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आढळतो देशी आणि संकरित जनावरे(animals) या रोगामुळे प्रभावित जास्त  होतात. विशेषतः संकरित आणि लहान जनावरांमध्ये हा रोग अत्यंत तीव्रतेने आढळून आला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या रोगांवरील लस ही लहान जनावरांमध्ये प्रथमतः सहा ते आठव्या आठवड्यात देण्यात येते व पुढील लसीकरण या नंतर दरवर्षी द्यायचे असते व ते साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत देण्यात येत आहे. ज्या भागात खुरकूत हा रोग सातत्याने आढळतो अशा भागात हे लसीकरण वर्षात दोनदा देण्यात येते आणि ते साधारणतः सप्टेंबर आणि मार्च या महिन्यात करायचे असते याची नोद घावी.

हे हि वाचा : लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण  

घटसर्प म्हणजे काय!

हा रोग मोठ्या जनावरांसोबत (animals)शेळ्या-मेंढ्यांतही फार  आढळतो. पावसाळ्यात होणारा हा रोग हवामानातील तीव्र बदलांमुळे किंवा लांबच्या प्रवासाअंती येणाऱ्या त्रासामुळे उद्‌भवत असतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण हे जास्त  अधिक असते. यामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबवण्यात येत असते. सर्वच वयोगटातील जनावरांमध्ये हे लसीकरण करण्यात येत असते. हे लसीकरण दरवर्षी पावसाळ्याआधी मे किंवा जून महिन्यांत घेण्यात येतात . घटसर्प हा रोग सातत्याने आढळणाऱ्या भागात हे लसीकरण वर्षात दोन वेळेस घेण्यात येतात.

फऱ्या रोग म्हणजे काय!

हा रोग मोठी जनावरे आणि शेळ्या-मेंढ्यांना देखील होत असतो . सहा ते 24-२५  महिन्यांची चांगल्या वाढीतील लहान जनावरे या रोगाने आजारी पडतात. फऱ्या हा रोग साधारणतः पावसाळ्यात आढळत असतो . जनावरांमध्ये प्राणघातक असणाऱ्या या रोगापासून बचावाकरिता या रोगांवरील प्रतिबंधक लस ही पावसाळा सुरू होण्याआधी  मे जून मध्ये देण्यात येते. या रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी ही लस सर्व वयोगटातील जनावरांना देण्यात येते. प्रथम लसीकरणानंतर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर दरवर्षी या प्रकारे ही लस देण्यात येत असते.

काळपुळी म्हणजे काय!

हा रोग प्राण्यांमधील अत्यंत घातक रोग प्राण्यांकडून मानवाला संक्रमित करणाऱ्या या रोगाचे लसीकरण अशा भागात विशेषतः राबवण्यात येते, जेथे हा रोग सातत्याने जास्त  आढळतो. या रोगासाठी लसीकरण हे फेब्रुवारी ते मे महिन्यात पावसाळ्याआधी घेण्यात येत असते. कारण साधारणतः पावसाळ्याच्या सुरवातीस या रोगांची लागण होत असते . सर्व वयोगटांतील जनावरांना ही लस देण्यात येते व दरवर्षी याच कालावधीत ही लस पुन्हा देण्यात येत असते .

गोचीड ज्वर कशाला म्हणतात!

संकरित जनावरांमध्ये महत्त्वाचा असा हा रोग साधारणतः उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान  मधे होतो. जनावरांवर असणाऱ्या गोचिडांमुळे हा रोग जास्त पसरतो. गोचीड नियंत्रणासोबतच या रोगावरील प्रतिबंधात्मक लस ही हा रोग प्रामुख्याने आढळणाऱ्या भागात देण्यात येत असते . सर्व वयोगटांतील जनावरांना दरवर्षी ही लस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात देण्यात येत असते.

लसीकरणादरम्यान काय काळजी घ्यावी!

लसीकरण शक्‍यतो सकाळ किंवा संध्याकाळी करण्यात यावे. लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांमध्ये करण्यात येत असते . लसीची मात्रा आणि लस देण्याची पद्धती ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठरवलेलीच वापर करावा. शक्‍यतो एका ठिकाणच्या जनावरांचे लसीकरण हे एकाच दिवशी करावे, गाभण जनावरांत लसीकरण करूच  नये नाही .

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment