Maharashtra Weather Alert राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तसेच आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने, तसेच अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आलेला आहे Maharashtra Weather Alert .
कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत आणि पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टे सक्रिय होत आहे. राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, आहिल्यानगर, सांगली, पुणे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.Maharashtra Weather Alert
बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे तसेच चंद्रपूर आणि वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, तर धुळे, सोलापूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे ३९ अंशांपेक्षा अधिक, तसेच जेऊर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे …
घरकुलासाठी आता मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार, महसूलमंत्र्यांचे निर्देश, तक्रार आल्यास कारवाई
आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने, तसेच अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे आणि संपूर्ण कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिल,, आहे.
बुधवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे—तापमान कमाल—तापमान किमान
पुणे—३३.६—२३.०
अहिल्यानगर—३५.२—२२.४
धुळे—३९.०—२२.५
जळगाव—३७.८—२५.८
जेऊर—३८.८—१९.०
कोल्हापूर—३४.८—२२.४