Voter ID Card: मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही आणि कारण निवडणूक आयोगाने याबाबत नवीन निर्देश जाहीर केले आहेत. आता १७ वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात येत आहे. मतदार नोंदणीबाबत तांत्रिक बाबी दूर करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यातील निवडणूक आयोगांना आदेश जाहीर केले आहेत.(Voter ID Card)
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आता मतदार यादीत नोंदवण्यासाठी १ जानेवारीला वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नसेल आणि तरूण १७ वर्षापेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. आता नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकणार आहे. प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाणार आहे. यातील पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येणार आहे.
तसेच नोंदणी झाल्यानंतर नव मतदारांना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र जारी केले जाणार आहे. मतदार यादी २०२३ मध्ये त्यात बदल केले जातील आणि कुठलाही नागरिक १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होतील त्याची नव्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल. अलीकडेच आरपी अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे आणि त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी योग्यता वर्षातून तिनवेळा देण्यात येईल. याआधी केवळ १ जानेवारीची पात्रता तारीख मानली जात होत होती Voter ID Card
त्याचसोबत आधार कार्डबाबत आयोगाने सांगितले की, आधार नंबर मतदार यादीशी जोडण्याबाबत नोंदणी फॉर्ममध्ये मतदारांसाठी तरतूद करण्यात येत आहे. सध्याच्या मतदारांसाठी आधार नंबर लिंक करावा यासाठी नवीन फॉर्म ६ ब आणला आहे आणि मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कुठल्याही अर्जाला नकार देण्यात येणार नाही.Voter ID Card
येथे करा ऑनलाइन अर्ज
ऑनलाइन अर्ज कसा कराल?
मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ब मध्ये भरून देऊ शकतो.
या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जाणार आहेत.
याशिवाय हा अर्ज क्र. ६ ब हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार आहे.
तसेच तुम्ही या ठिकाणी लोगिन केल्यावर तुम्ही आपली मदान यादी पाहू शकता.तसेच मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. दुरुस्ती हि करू शकता.
येथे करा ऑनलाइन अर्ज
हे हि वाचा : महिला सरपंचांच्या पतीच्या लुडबुडीला लागणार लगाम!
Nice