Land Revenue Act: रस्ता मागणी आणि रस्ता अडविणे ( Road requisition application and road blocking )
Land Revenue Act: मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे मोठ्या प्रमाणात झाले आहे. जमीन मालक बदलले आणि त्यामुळे काही ठिकाणी नवीन खरेदीदाराला त्याच्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होत नाही. त्यामुळे तो तहसिलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज करत असतो. स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना असतो.
Land Revenue Act अनेकवेळा असे दिसुन येते की, तहसिलदारांकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये दाखल केलेल्या रस्ता मागणीच्या अर्जावर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार निकाल दिला जात असतो तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अन्वये दाखल अर्जावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदींनुसार निकाल दिला जात आहे. ही बाब चुकीची आहे आणि एका कायद्यान्वये दाखल अर्जावर अन्य कायद्यातील तरतुदींनुसार निकाल देणे बेकायदेशीर आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा अधिकार तहसिलदारांना आहे आणि तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ च्या तरतुदींनुसार शेती किंवा चराईसाठी वापरात असलेल्या कोणत्याही जमिनीतील उपलब्ध रस्त्याला आणि स्वाभाविकपणे वाहत असेल अशा पाण्याच्या प्रवाहाला कोणीही अवैधरित्या अडथळा केला असेल तर असा अवैध अडथळा काढून टाकण्याचा अधिकार तहसिलदारांना असतो.
म्हणजेच म.ज.म.अ. कलम १४३ अन्वये कार्यवाही करतांना रस्ता आधीच उपलब्ध नसतो आणि परंतु मा.को.ॲ. १९०६, कलम ५ अन्वये कार्यवाही करतांना रस्ता आधीच उपलब्ध असतो.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४३ :
( Maharashtra Land Revenue Act 1966, Section 143 )
या कलमानुसार तहसिलदारांकडे रस्ता मागणीसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे अर्जाबरोबर सादर करणे गरजेचे असते.
- अर्जदाराच्या शेतजमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरुन रस्त्याची मागणी केली आहे त्याचा कच्चा नकाशा असणे आवश्क असते.
- अर्जदाराच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा (उपलब्ध असल्यास) देणे .
- अर्जदाराच्या जमीनीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) सात-बारा उतारा आवश्क.
- लगतच्या शेतकर्यांची नावे व पत्ते व त्यांच्या जमिनीचा तपशील सादर करणे.
- अर्जदाराच्या जमीनीबाबत जर न्यायालयात काही वाद सुरु असतील तर त्याची कागदपत्रांसह माहिती पुरविणे.Land Revenue Act

रस्ता मागणीसाठी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय आहे :
( What is the process after applying for road demand )
१. अर्ज दाखल करुन घेतला जात असतो.
२. अर्जदार व ज्या शेतकर्यांच्या भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत असते.
३. अर्जदाराने सादर केलेल्या कच्च्या नकाशावरुन किमान किती फूटाचा रस्ता देणे आवश्यक आहे याची पडताळणी केली जात असते.
४. तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांचेमार्फत समक्ष स्थळ पाहणी करण्यात येते आणि स्थळ पाहणीच्या वेळेस अर्जदाराला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय याची खात्री करण्यात येत असते.
५. रस्ता मागणीचा निर्णय करतांना तहसिलदारांनी खालील प्रश्नांची उत्तरे लक्षात घेणे अपेक्षित असते:
अ. अर्जदाराला स्वत:च्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय हे पाहणे?
ब. अर्जदाराच्या शेताचे यापूर्वीचे मालक कोणत्या मार्गाचा वापर वागत करीत होते?
क. जर नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे?
ड. मागणी केलेला रस्ता सरबांधावरुन आहे काय हे पाहणे?Land Revenue Act
इ. अर्जदाराला शेतात येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय याची चाचपणी करणे?
फ. अर्जदाराला नवीन रस्ता दिल्यास लगतच्या शेतकर्यांच्या होणार्या नुकसानाचे प्रमाण किती असेल याचे मूल्य ?Land Revenue Act
हे हि वाचा |: शेतरस्ता अडविल्यास तर काय कराल कायदा काय म्हणतोय ? 2022
६. उपरोक्त सर्व बाबींची शाहनिशा करुन, नवीन रस्ता देणे आवश्यक आहे याची खात्री पटल्यानंतर, तहसिलदार अर्ज मान्य करतात किंवा मागणी फेटाळत असतात. अर्ज मान्य झाल्यास, असा रस्ता लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्याचा आदेश पारित केला जात असतो. त्यावेळेस लगतच्या शेतकर्यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पाहिले जात असते.Land Revenue Act
- रस्ता देतांना दोन्ही बाजूने ४—४ रूंद असा एकूण ८ फुट रुंदीचा पायवाट रस्ता देता येत असतो. उभतांच्या सहमतीने अशा रस्त्याची रुंदी कमी-जास्त करता येत असते आणि गाडी रस्ता देतांना तो ८ ते १२ फूट रुंदीचा देता येतो.
- वाजवी रुंदीपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्याची मागणी असल्यास अर्जदाराने लगतच्या शेतकर्याकडून रस्त्याचे हक्क विकत घेणे अपेक्षीत ठरत आहे.
- म.ज.म.अ.१९६६, कलम १४३ अन्वये फक्त बांधावरुनच रस्ता देतो येतो, या कलमाचे शीर्षकचं “हद्दीवरुन रस्त्याचा अधिकार” असे म्हणतात आहे, त्यामुळे एखादा गटाच्या मधून रस्ता दिल्यास अशी कार्यवाही कलम १४३ च्या तरतुदींशी विसंगत होईल आणि त्याविरुध्द दिवाणी न्यायालयात अपील झाल्यास तिथे असा निर्णय टिकवता येणार नाही.
- कलम १४३ अन्वये रस्ता देतांना ‘गरज’ (Necessity) तपासली जात असते. या ठिकाणी ‘Indian Easement Act 1882’ चे कलम १४ पहावे, यात असा रस्ता ‘Reasonably convenient’ असावा असा शब्दप्रयोग आहे, तर कलम १४३ मध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी योग्य मार्गाची किती जरुरी आहे, याकडे तहसीलदाराने लक्ष द्यावे असे नमूद असते आहे, या कलमाखाली किती रुंदीच्या रस्त्याच्या वापराचा हक्क मान्य करावा याबाबत तरतुद आढळून येत नाहीत आणि त्यामुळे गुंतागुंत टाळण्यासाठी आदेशात ‘बांधाच्या एकाबाजूने एक चाकोरी व दुसऱ्या बाजूने एक चाकोरी’ असा किंवा तत्सम उल्लेख करुन आदेश पारित करावा, या कलमाखाली फक्त “रस्त्याच्या वापराचा हक्क” मान्य केला जात असतो, “रस्त्याच्या जागेचा नाही” याची नोंद घेणे गरजेची असती.
- तहसिलदारांचा आदेश मान्य नसल्यास त्याविरूध्द, आदेश प्राप्त झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येत असते आणि किंवा तहसिलदारांच्या निर्णयाविरूध्द एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येत असतो. आणि दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यास महसूल अधिकार्याकडे अपील करता येत नाही.
- रस्त्याच्या निर्णयाची नोंद, ज्या खातेदाराच्या जमिनीतून रस्ता दिला आहे त्या खातेदाराच्या सात-बाराच्या ‘इतर हक्क’ सदरी नोदविता येत असते. त्याच बरोबर ‘वाजिब ऊल अर्ज’ मध्ये देखील अशा नोंदी घेतल्या जाऊ शकतात.
- मा. उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाचा विचार करता, खाजगी जमिनीतून असलेले वहीवाटीचे रस्ते व इतर सुविधाधिकार यांच्या नोंदी ‘वाजिब ऊल अर्ज’ मध्ये काळजीपूर्वक घेणे आवश्यक आहे आणि तसेच तहसीलदार यांनी मा.को.ॲ. कलम ५ अन्वये किंवा म.ज.म.अ. कलम १४३ नुसार आदेश पारित करुन, अनुक्रमे अडथळा दूर केल्यास किंवा नवीन रस्ता दिल्यास अशा रस्त्यांच्या नोंदी सुद्धा ‘वाजिब ऊल अर्ज’ मध्ये घेणे आवश्यक असते.
मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५ : शेतीच्या अस्तित्वात असणार्या रस्त्याला अडथळा करणार्याविरूध्द मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६, कलम ५(२) अन्वये (हरकतीपासून सहा महिन्याच्या आत) दावा दाखल करता येत असतो. मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अन्वयेचे कामकाज दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालविले जात असते.
मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ मधील महत्वाच्या तरतुदी :
- हा कायदा फक्त शेत जमिनींनाच लागू आहे, अकृषिक जमिनींना नाही याची दखल घावी.
- हा कायदा मुंबई वगळता सर्व महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
mla hi raasta nahi
अर्ज करून खुप दीवस झाले आहेत
पन अजून पहाणी नाही झा झाली
रस्ता मागणीच्या अर्ज केल्या नंतर किती दिवसात पहायला येतात तहसीलदार