शेवंती लागवड फुल शेती 2022 - डिजिटल शेतकरी

शेवंती लागवड फुल शेती 2022

शेवंती ही बहुवर्षायू ओषधी ६०- ९० सेंमी  उंच वाढत असते. शेवंती तिचे मूलस्थान चीन व जपान आहे असे म्हणतात. शेवंती विविधरंगी आकर्षक फुलांसाठी तिची लागवड भारतात सर्वत्र मोठया प्रमाणावर होत असते.शेवंती पाने साधी, एकाआड एक, सुवासिक व पिसासारखी, पण थोडी विभागलेली, साधारण केसाळ असते. फुलोरे स्तबक प्रकाराचे एक एकटे किंवा कमी अधिक गुलुच्छाप्रमाणे नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये हे येत असते. फुले कडू , दीपक (भूक वाढविणारी) व सौम्य रेचक असते. चीनमध्ये पाने निर्मलीकारक म्हणून वापरतात व अर्धशिशीवर देत असतात. शेवंती काळ्या मिरीबरोबर परम्यावर देत असतात. फुलांचे विविध रंग त्यांतील कॅरोटिनॉइडांमुळे येत असतात. लाल प्रकारच्या फुलांत क्रिसँथेमिन हे ग्लुकोसाइड असते व पिवळ्या फुलांत फ्लॅव्होन हे रंगद्रव्य ल्यूटिओलिन या ग्लुकोसाइडाच्या रूपात आहे. बियांपासून अर्धशुष्क तेल मिळत असते.क्रिसँथेमम सिनेरॅरिफोलियम (पायरेथम सिनेरॅरिफोलियम), कि. कॉक्सिनियम व कि मार्शली या तीन जातींच्या वाळलेल्या स्तबकांना पायरेथम हे नाव आहेत .त्यात कीटक नाशक गुण जास्त असतात. कि. कॉरोनॅरियमया जातीची फुले लिंबासारखी पिवळी किंवा जवळजवळ पांढरी  रंगाची असतात.

शेवंतीची लागवड

शेवंतीची लागवड निमदुष्काळी भागात जास्त केली जात असते. महाराष्ट्रात ती विशेषतः पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदे या तालुक्यांत जास्त प्रमाणात आहे. बहर संपल्यावर वनस्पतीच्या फांद्या जमिनीपासून ५-६ सेंमी. ठेवून कापत असतात. फांद्यांचे शेंडे कापून मधल्या भागाचे ३-४ डोळे असलेले फाटे बियाणे म्हणून वापर करतात. धुमाऱ्यापासूनही लागवड करतात. शेवंतीला हलकी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमीन लागत असते. उत्तम मशागत करून तीत शेणखत किंवा कंपोस्ट खत आवश्यक त्या प्रमाणात मिसळून देत असतात. तसेच हेक्टरी १०० किग्रॅ. नायट्रोजन, ७५ किग्रॅ. फॉस्फरस व १००-११०  किग्रॅ. पोटॅश ही वरखते विभागून देतात. ४५-६० सेंमी. अंतरावर सरी काढून तीच्या बगलेला ४० -४५ सेंमी. अंतरावर बियाणे ऊसाच्या च्या कांड्याप्रमाणे आडवे लावतात. नियमित हलक्या पाण्याच्या पाळ्या देत असतात.

संकराने शेवंतीचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत आणि  त्यांतील झिपरी, पिवळी रेवडी, पांढरी रेवडी, राजा हे प्रकार लागवडीत जास्त आहेत. त्यांच्या फुलांचे हेक्टरी उत्पादन ९,५००-१०००  किग्रॅ.पर्यंत मिळते. उन्हाळी लागवडीचे उत्पादन जास्त येत असते.

2 thoughts on “शेवंती लागवड फुल शेती 2022”

Leave a Comment