Onion : चुकीच्या निर्यात धोरणांमुळे कांदा उत्पादक हवालदि
सध्या उन्हाळ कांदा हा( Onion )(Summer Onion) कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही सध्या (Onion Production Cost) भरून निघत नाही. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे सरासरी दर (Onion Rate) ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान कमी जास्त होत आहेत. यास कारणीभूत केंद्राचे कांदा निर्यातीबाबत चुकीचे धोरण (Onion Export Policy) असून कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाला दिसत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले गेले आहे. असा आरोप करीत शेतकऱ्यांची कोंडी सोडवा, असे आणि वास्तव शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निदर्शनास आणून गेले दिले.
खासदार डॉ. भामरे हे बुधवारी (ता. २४) मतदारसंघात दौऱ्यावर करत होते. या वेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, तालुका युवा आघाडी जितेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष नयन सोनवणे, कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, बाजार समितीचे माजी सभापती संजय भामरे, सामाजिक कार्यकर्ते बिपिन सावंत, राकेश घोडे या वेळी येथे उपस्थित होते.
चालू वर्षी कांद्याचे ( Onion )घटलेले उत्पादन त्यात उत्पादन खर्चाच्याखाली दर मिळत असल्याने कसमादे भागात शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे आणि या पार्श्वभूमीवर चालू सप्ताहात तीन आंदोलने झाली. वातावरण तापलेले असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. भामरे यांना गाठले आहे. कांदा दरातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
हे हि वाचा : पिकात अतिरिक्त पाणी साचल्याचे परिणाम व उपाय काय आहे जमिनीत जास्त पाणी झाल्यास काय कराल
शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र सरकारकडे मांडा
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. भामरे यांच्याकडे कांद्याच्या दरासंदर्भात गाऱ्हाणे मांडले आहे. बँक क्षेत्रातील पीककर्ज घेताना सीबिल प्रश्न, रासायनिक खतांचे लिंकिंग, पाणंद रस्त्यांचा प्रश्न अशा शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रापर्यंत पोहोचाव्यात, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची वास्तविक स्थिती आहे आणि यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना याबाबत कळविले गेले आहे. राज्य सरकारने यापूर्वी कांद्याचे दर घसरले असता अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटलला पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे आणि शेतकऱ्यांना कोंडीतून बाहेर काढण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे.
3 thoughts on “Onion : चुकीच्या निर्यात धोरणांमुळे कांदा उत्पादक हवालदिल 2022”