देशातील बाजारात(market prices)सोयाबीन दर स्थिरावले दिसत आहेत. अनेक बाजारात नव्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली आहे तसेच पेरणीही जवळपास पूर्ण झाली आहे. देशात आजपर्यंत १२० लाख ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सोयाबीनचा हा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत केवळ ८ हजार हेक्टरनं पिछाडावर गेला आहे. तर सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसानं पिकाचं नुकसानही झाले आहे. सध्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला हा दर(market prices) टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला गेला आहे.
कापूस यंदाही भाव खाणार
सध्या कापसालाही चांगला दर(market prices) मिळत आहे मागील ८ ते १० दिवसांपासून देशातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. राज्यातही चार दिवसांपासून बहुतांशी ठिकाणी पाऊस झाला आहे. या पावसानं माॅन्सूनपूर्व कापूस लागवडीचं नुकसान हे प्रचंड वाढलंय. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि पंजाब तसंच तेलंगणातील काही भागांत कापूस पिकाचं नुकसान झाले आहे. कापूस उत्पादन यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी ऑक्टोबरच्या शेवटी चित्र स्पष्ट होणार हे. सध्या कापसाला मागणी असल्यानं ८ ते १० हजार रुपयांचा दर मिळत आहे. मात्र नव्या कापसात ओलावा जास्त असतो आणि त्यामुळं या कापसाला ८ ते ९ हजार किवा त्यापेक्षा जास्त रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
देशात सध्या तुरीसह इतर कडधान्याचे दर(market prices) वाढलेले आहेत तसेच केंद्रीय कृषी विभागानं आज प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार देशातील कडधान्य लागवड ४ टक्क्यांनी घटली आहे. यात तुरीचा पेरा जवळपास ५ टक्के कमी झाला आहे. तर उडीद आणि मुगाची लागवडही ६ टक्क्यांनी घटली आहे. आधीच पुरवठा कमी आणि त्यात पेराही घटल्यानं या तीनही कडधान्याचे दर तेजीत दिसत आहेत. यात तुरीला चांगला दर मिळतोय आणि सध्या तुरीचे व्यवहार ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीचा हा दर(market prices) पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगातून व्यक्त होत आहे.
ढोबळी मिरची खातेय भाव
राज्यातील बाजारात ढोबळी मिरचीला सध्या चांगला दर(market prices) मिळत आहे. ढोबळी मिरचीची बाजारात आवक सध्या नगण्य आहे आणि पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजारात १०० क्विंटलपेक्षा जास्त आवक होतेय. मात्र इतर बाजार समित्यांधील आवक ही ३० क्विंटलपेक्षा कमीच झाली आहे. त्यामुळं ढोबळी मिरची भाव खातेय तसेच या मिरचीला सध्या २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळत आहे. तसंच बाजारात ढोबळ्या मिरचीची आवक लगेच वाढण्याची फार शक्यता कमीच आहे. त्यामुळं हा दर(market prices) टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
1 thought on “Market prices : सोयाबीन, कापूस, तूर, ढोबळी मिरची पहा काय असतील बाजार भाव 2022”