Pashu Aadhar : गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी पहाट आणली आहे तसेच काही किसान योजना असो की अन्य कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जात असते. यामुळे भ्रष्टाचार तेवढ्यापुरता कमी झाला आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ऐकायला थोडी विचित्र वाटेल परंतू, म्हशीचेही आधार कार्ड(Pashu Aadhar) काढण्याची घोषणा केली आहे आणि महत्वाचे म्हणजे याची तयारीही सुरु झाल्याचे ते म्हणाले आहे.
मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन केल आहे. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड (Pashu Aadhar) बनविले जाणार आहे, असे ते यावेळी म्हणाले आहे. भारतातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे तसेच भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डाटाबेस (Pashu Aadhar) तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे, असे ते म्हणाले आहे.
आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागत असते म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जात असते. याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले आहे. पशु आधार (Pashu Aadhar) असे या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे आणि जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास मदत होईल, असे हि मोदींचे म्हणणे आहे.
हे हि वाचा : ‘या’ वनस्पतीच्या लागवडीमुळे बदलेल नशीब! 5 हजारांच्या गुंतवणुकीवर होईल 4 लाखांची कमाई!

बन्नी म्हैस…
गुजरातमधील कच्छमध्ये बन्नी म्हैशीची प्रजाती आहे या म्हैशीचा मोदींनी एक किस्सा देखील सांगितला आहे. दिवसा तिथे खूप उन असते आणि यामुळे ही म्हैस रात्रीच्यावेळी चरत असते. ती चाऱ्यासाठी गोठ्यापासून १५ ते १७ किमीचा प्रवास करत असते. परंतू दिवस उजाडू लागताच ती परत तिच्या गोठ्यात वाट न चुकता येत असते. बन्नी म्हैस गोठा किंवा रस्ता चुकल्याचे खूप कमी ऐकू येत आहे. परदेशातून आलेल्या आमच्या मित्रांना हे ऐकून धक्का बसेल की ती जेव्हा चरायला जाते तेव्हा तिचा मालक किंवा गुराखी त्यांच्यासोबत नसतो आणि वाळवंटात पाणी कमी असते परंतू, त्या पाण्यातही तिचे भागत असते असे मोदी म्हणाले आहे.