अळू लागवड 2022 - डिजिटल शेतकरी

अळू लागवड 2022

अळू लागवड अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीनिची निवड करण्यात यावी.

जमिनीची योग्य मशागत करून जमीन तयार करावी आणि  लागवड जून, जुलै, सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात करावी.

वडीच्या अळूसाठी कोकण हरितपर्णी ही जात निवडावी आणि  लागवड 90 बाय 30 सें.मी. अंतराने करवी. लागवडीसाठी निरोगी कंद निवडविण्यात यावे.

लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळून द्यावे आणि  माती परीक्षणानुसार 80 -८५  किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 80 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार पिकाला पाणी द्यावे.

पानांचा उपयोग करायचा असल्यास दोन ते अडीच महिन्यांनी तोडणी सुरवात करावी..

अशी तोडणी आठ ते नऊ महिने करता येत असते  आणि  कंदाचा उपयोग करायचा असल्यास सहा महिन्यांत कंद तयार होत असतात.

Leave a Comment