काही दिवसात रब्बी(Rabi) हंगाम सुरु होत आहे तर त्या आधी आपणास माहित असली पाहिजे कि पिक नियोजन करताना काय काय काळजी घेतली पाहिजे. त्यातील एक भाग पुढील प्रमाणे पहा. (Rabi Intercropping) कोरडवाहू (Rainfed) परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा (Rabi) जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक (Intercropping) आणि दुबार पीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत म्हत्वाचे आहे. मराठवाड्याच्या मृदा व पर्जन्यमानानुसार हमखास जास्त उत्पादन आणि नफा देणाऱ्या खालील आंतरपीक आणि दुबार पीक पद्धतीची शिफारस करण्यात येत आहेत.
रब्बी(Rabi) हंगामात सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक प(Rabi) द्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येत असते आणि उत्पादन वाढत असते. तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळत येत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी हंगामासाठी पुढील शिफारशी केल्या जात आहेत.
रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी + हरभरा ६:३ आणि रब्बी ज्वारी + करडई ६:३ या आंतरपीक पद्धती अधिक आर्थिक आणि पिक चांगले फायदा देणाऱ्या आहे.
फायदेशीर आंतरपीक पद्धती कोणत्या आहेत?
१) रब्बी ज्वारी + करडई
ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई च्या सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येत असते. ही आंतरपीक पद्धत ६:३ या ओळीच्या तासाच्या प्रमाणात घेण्यात यावी.
२) करडई + हरभरा
मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात येत आहे. ४:२ अथवा ६:३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धत घेतल्यास जास्त फायदा होत असतो.
दुबार पीक पद्धती
ज्या जमिनीची खोली एक मीटर अथवा त्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीवर दुबारपीक पद्धत यशस्वीरित्या घेता येत असते. अशा जमिनीमध्ये खालील दुबार पीक पद्धतीची शिफारस करण्यात येत आहे.
खरीप मूग / उडीद / सोयाबीन – रब्बी ज्वारी / हरभरा / करडई
खरीप संकरित ज्वारी – करडई / हरभरा / जवस
हे हि वाचा : शेअर बाजार -एक व्यवसाय
1 thought on “Rabi Intercropping : रब्बी हंगामासाठी कोणत्या आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे पाहूया?2022”