धक्कादायक! 12 हजार रुपये, एका मेंढराच्या( sheep) बोलीवर दोन मुली ठेवल्या चक्क गहाण - डिजिटल शेतकरी

धक्कादायक! 12 हजार रुपये, एका मेंढराच्या( sheep) बोलीवर दोन मुली ठेवल्या चक्क गहाण

जव्हार : देशातील सामान्य(sheep) आदिवासींच्या नशिबातील भाकरीचा चंद्र शोधण्याचा संघर्ष मात्र कायम सुरु  आहे. प्रसंगी पोटच्या गोळ्यांना कामाला जुंपले जाणे काळजावर दगड ठेवून सोसावे लागत असते. जव्हारच्या घटनेने समाजाची मान शरमेने खाली जाण्यासारखी बातमी घडली आहे. दोन धनदांडग्यांनी मेंढ्या( sheep) चारण्यासाठी १२ हजार रुपये व एका मेंढरूच्या बोलीवर दोन आदिवासी अल्पवयीन मुलींना गहाण ठेवून घेतल आहे. त्यातील एका मुलीला त्यांनी अचानक जव्हारला परस्पर आणून सोडले, तर दुसरी( sheep) मुलगी बेपत्ता झाली आहे.

sheep

आदिवासी मजुरांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेणाऱ्या या धनदांडग्यांविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात वेठबिगार उच्चाटन आणि बालमजूर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी जव्हार, मोखाड्यातील आदिवासी स्थलांतर करत असतात. जव्हार तालुक्यातील धारनहट्टी येथील नरेश भोये (२८) हा अहमदनगर जिल्ह्यातील तळेगाव येथे खडी फोडण्यासाठी देवराम कांदडकर व पुंडलिक कांदडकर यांच्याकडे गेल होते. २०१९ मध्ये मोठी मुलगी मनीषा  (८) हीस १२ हजार आणि एक मेंढरू देण्याच्या बोलीवर मेंढरे चारणे, सोडणे, लेंड्या काढणे, साफसफाईसाठी मागितल होते. नरेशने त्याला सहमती दिली होती. त्यानंतर त्याची लहान मुलगी काळी (६)  हिलादेखील २८ मार्च २०२१ ला हाच मोबदला देऊन कामावर नेले होते.

हे हि वाचा : या जिल्ह्यात १८ हजार घरकुलांना मजुंरी

मोठीला आणून सोडले अन्…

नरेशचे कुटुंब जव्हारला घरी परतले असता; परंतु या दोन्ही मुली कांदडकरकडे कामासाठी तेथेच राहिल्या( sheep)  होत्या. १७ सप्टेंबरला कांदडकरांनी मोठी मुलगी मनीषाला अचानक जव्हारच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिरपामाळ येथे आणून सोडले होतेआणि तेथून पोबारा केला होता. मनीषा तेथून पायपीट करत घरी पोहोचली होती. यावेळी नरेशने लहान मुलगी काळीविषयी चौकशी केली असता, ती मला तीन दिवसांपासून भेटली नसून ती कुठेतरी अन्यत्र काम करत असल्याचे मनीषाने सांगितले आहे. त्यामुळे नरेशच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याने तातडीने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्या सीता घाटाळ यांना संपूर्ण प्रकार सांगितला असता त्यांनी जव्हार पोलीस ठाणे गाठले आहे पुढील तपास हा चालू आहे.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

3 thoughts on “धक्कादायक! 12 हजार रुपये, एका मेंढराच्या( sheep) बोलीवर दोन मुली ठेवल्या चक्क गहाण”

Leave a Comment