- subsidy agricultural mechanization: कृषी देशातील कृषी क्षेत्राच्या वाटचालीमध्ये यांत्रिकीकरणाची (Agri Machinery) भूमिका महत्त्वाची असते आणि कृषी या यांत्रिकीकरणाच्या मदतीनं शेतकऱ्याच्या (Famrer) वेळेची तर बचत होऊच लागली मात्र त्यासोबतच कष्टाचाही भार किंचितसा का होईना पण हलका होत आहे.
- याच यांत्रिकीकरणाला चालना मिळावी म्हणून सरकारच्या पातळीवरून प्रयत्न सुरूच आहेत आणि आता यंत्र म्हणलं की, आपल्याला आठवतं ते ट्रॅक्टर (Tractor). पण मुद्दा तेवढ्या पुरता मर्यादित नाही आणि शेत कामासाठी लागणाऱ्या इतरही यंत्र महत्त्वाचे असते.
- देशातील शेतकऱ्याने या आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती अधिक जोमाने करता यावी म्हणून केंद्र सरकारने एक योजना सुरू केली केली आहे आणि या योजनेचे नाव आहे ‘सब-मिशन ऑन अॅग्रीकल्चर मॅकेनाझेशन’ (Sub-Mission On Agriculture Mechanization) म्हणजेच स्माम होय. (SMAM
- या योजनेतून कृषी यांत्रिकीकरणासाठी केंद्र सरकार अनुदान (Subside) देत असते आणि केंद्र सरकार किती टक्के अनुदान देते ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? कोणत्या शेतकऱ्याला सरकार अनुदान देते ? हे पाहणार आहोत.subsidy agricultural mechanization
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ?
स्माम या योजनेत देशातील सर्वच शेतकरी सहभागी होऊ शकणार आहेत. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महिलाही अर्ज करू शकत आहे. अर्जदार शेतकरी ओबीसी, अनूसूचित जाती, जमातीमधील असतील तर त्यांना यंत्र खरेदीवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- स्माम या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे ओळखपत्र आवश्यक असते आणि त्यासोबतच आधारकार्ड, (Adhar Card) पॅनकार्ड (PAN Card), वाहन चालक परवाना (Driving License) , जमिनीचा सातबारा, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक (Bank Passbook) आवश्यक असते.
- अर्जदार शेतकरी ओबीसी, अनूसूचित जाती जमातीतील असतील तर जात प्रमाणपत्र असणं आवश्यक असते. तसेच या योजनेतून अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होत असते. त्यामुळे बँकमध्ये खाते असणे गरजेचे असते.subsidy agricultural mechanization
अर्ज कसा करायचा ?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत असतो आणि तो अर्ज कुठे करायचा ? कसा करायचा ? तेही सांगत आहे. तर स्माम योजनेचा लाभ घेण्यासाठी agrimachinery.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागत असते.
- नोंदणी करताना वर जी काही कागदपत्रे सांगितली आहेत, ती अर्जदार शेतकऱ्याने जवळ बाळगावीत आणि शेतकरी हा अर्ज स्वतच्या मोबाइलवरूनही करू शकत आहे. त्यासाठी काय करायचं तर ते पाहूया खालीप्रमाणे.
ऑनलाइन नोंदणी कशी कराल ?
- agrimachinery.nic.in या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन असा पर्याय वेबसाईटवर दिसतो. रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर हा पर्याय दिसत आहे.
- फार्मर हा पर्याय निवडल्यानंतर सुरुवातीला त्यामध्ये आवश्यक कागदपत्राची माहिती दिलेली असते आणि त्यानंतर अर्जदार शेतकऱ्याने आधार नंबर, मोबाइल नंबर आणि आधार कार्डावरील नाव तिथे नोंद करायचे आहे
- आधार कार्डचा पर्याय निवडल्यानंतर अर्जदार शेतकरी कोणत्या राज्यातील आहे याचीही माहिती द्यावि लागणार आहे . महाराष्ट्रातील अर्जदार शेतकऱ्यांनी महाराष्ट्र हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर एक अर्ज ओपन होईल. त्यावर अर्जदार शेतकऱ्याने आपलं नाव, गाव, जिल्हा, वय आदि माहिती भरायची असती.
- ही माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर आपली ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्याचा एक मेसेज आपल्या आधार संलग्न मोबाइल क्रमांकावर येणार आहे तसेच आणि आपला अर्ज पूर्ण होईल.
हे हि वाचा : कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु
1 thought on “subsidy agricultural mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी किती अनुदान मिळतं काय आहे नवीन योजना 2023 ?”