गंधक एक आवश्यक अन्नद्रव
( Sulfur An Essential Nutrient See How Much Sulfur in Which Fertilizers? )
फॉस्फो जिप्सम : ११ टक्के गंधक गंधकयुक्त खतांचा वापर कसा करावा?
Sulfur गंधक हे पिकांच्या वाढीसाठी लागणारे एक महत्व पूर्ण अन्नद्रव्य आहे. पूर्वी शास्त्रज्ञ गंधकाला दुय्यम अन्नद्रव्य संबोधित होत होते. अथापि त्याची आवश्यकता वाढल्यामुळे त्याचा मुख्य अन्नद्रव्यामध्ये समावेश करण्याची वेळ आली आहे आणि वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्वाचा असून वनस्पती श्वसनक्रिया, तेल निर्मीती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्वपूर्ण भूमिका काम करते.
जमिनीमधून पिके विशेष जास्त उत्पादन देणारे संकरित वाण दर हंगामात गंधकाचे मोठया प्रमाणावर शोषण करत असतात. परंतु जमिनीमध्ये गंधकयुक्त खते त्याप्रमाणात टाकली जात नाहीत आणि नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट ऐवजी युरियाचा वापर वाढत असतो. जवळजवळ स्फुरद इतकेच गंधक बहुतेक पिके जमिनीतून मुळाद्वारे घेतली जातात. विशेषतः तेलबिया पिकाची गंधकयुक्त खताची गरज जास्त प्रमाणात असते आणि मात्र त्याची जमिनीत भरपाई त्याप्रमाणात केली जात नाही.
गंधकाचे महत्व ( Importance of sulfur )
- गंधकाच्या वापरामुळे उत्पादन आणि लाभाशांत वाढ होत असते.
- गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवतेत वाढ होत जाते.
- गंधकामुळे जमिनीचे आरोग्य आणि चिरस्थायी उत्पादकता टिकविता येत असते.
- गंधकामुळे नत्राची कार्यक्षमता व उपलब्धता वाढत असते.
- गंधकाला ‘भुसुधारक’ असे म्हणतात आणि कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्वाचा ठरत असतो.
- अतिशय महत्वाचे म्हणजे गळितधान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी गंधकाचा उपयोग होत असतो.
- गंधकामुळे पर्यावरण संवर्धन होत असते.
- इतर अन्नद्रव्यासोबत सकारात्मक फायदा होत आहे.
गंधकाचे कार्ये (Functions of Sulfur )
- गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करत असते. यामुळे पिकाच्या अन्ननिर्मीतीला चांगली चालना मिळत असते.
- वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जिवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये आढळत असते आणि हे तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते. उदा. कांदा, लसूण.
- गंधक हे अमायनोअॅसिड तयार करण्यास मदत करते व तो त्याचा घटक आहे उदा. सिस्टीन व सिस्टाईन म्हणजेच प्रथिने तयार होण्यास गंधक आवश्यक प्रमाण आहे.
- गंधक हा मिथीओनाईन, थायमीन आणि बायोटीन यांचा महत्वपूर्ण घटक असते.
- गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते आणि जर गंधक कमी पडल्यास १८-२० टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.
- गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करत असते.
- वनस्पतींच्या निरनिराळया विकरांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करत असते.
- फळे तयार होण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता आहे.
गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये आढळून येणारी लक्षणे
( Sulfur deficiency symptoms in crops )
- गंधकाचा अभाव झाल्यास पाने पिवळी पडत असतात.
- फळे पिवळसर हिरवी दिसतात, त्याची वाढ कमी होते, रंग बदलतो व आतील गर कमी होत असतो.
- नवीन येणारी पाने आणि पालवी पिवळी पडू लागते, देठ किरकोळ व आखुड राहत असतात. कोवळया पानांवर जास्त परिणाम दिसत असतो.
- द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरिकरणाच्या गाठीचे प्रमाण कमी होत असते.
- पानगळ लवकर होते, पानांच्या कडा व शेंडे आतल्या बाजूस सुरळी होऊन गळत असतात.
- प्रथिने आणि तेलाचे प्रमाण घटत असते.
पिक उत्पादनासाठी गंधकाचे इतर स्त्रोत
( Other sources of sulfur for crop production )
१) जमिन २) सेंद्रिय खते ३) पिकांचे अवशेष ४) प्रेसमड ५) गंधकवर्गीय किटकनाशके ६) पाऊस आणि ओलीत
गंधकयुक्त खते (Sulfuric fertilizers )
- सिंगल सुपर फॉस्फेट : ११ टक्के गंधक असते.
- डबल सुपर फॉस्फेट : १o टक्के गंधक असते.
- अमोनियम सल्फेट : २४ टक्के गंधक असते.
- अमोनियम फॉस्फेट सल्फेट : १५ टक्के गंधक असते.
- पोटॅशियम सल्फेट : १८ टक्के गंधक असते.
- जस्त सल्फेट ; १५ टक्के गंधक असते.
- जिप्सम : १६ – २० टक्के गंधक असते.
- मुलद्रव्यी गंधक (गंधक पुड) : ८५ – १00 टक्के गंधक असते.
- आयरन पायराईट : २२ – २४ टक्के गंधक असते.
- फॉस्फो जिप्सम : ११ टक्के गंधक गंधकयुक्त खतांचा वापर कसा करावा?
- शिफारशीनुसार पिकानुरूप जमिनीद्वारे गंधकयुक्त खते द्यावी लागत असते.
- तेलबिया पिकांना हेक्टरी २o किलो गंधक जमिनीद्वारे दिले पाहिजे.
त्याचप्रमाणे समतोल खत व्यवस्थापनासाठी माती परिक्षण करून जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता पडताळून पाहणे आवश्यक असते. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकासाठी २o ते ४o किलो ग्रॅम गंधकाची मात्रा उपयुक्त ठरत असते.