Sweet Orange : फळगळीचे नेमके कारण ओळखून उपाययोजना करा 2022 - डिजिटल शेतकरी

Sweet Orange : फळगळीचे नेमके कारण ओळखून उपाययोजना करा 2022

पाण्याचा ताण, संजीवकांचे असंतुलन, पोषक घटकांची कमतरता या सारख्या कारणामुळे, किंवा रोग- कीटकांच्या प्रादुर्भावामुळे (Pest Disease Outbreak) लिंबूवर्गीय(Sweet Orange) फळाची फळगळ (Citrus Crop Fruit Fall) होत आहे. त्याचे नेमके कारण ओळखून उपाययोजना करण्यात यावी. असे मत औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्र हिमायतबागचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Sweet Orange

वाढीच्या अवस्थेतील फळांमध्ये(Sweet Orange)पाणी, कर्बोदके आणि संजीवकासाठी झालेल्या स्पर्धेमुळे फळगळ होत असते. या दरम्यान पाण्याचा ताण आणि वातावरणातील वाढलेले तापमानामुळे लहान फळे जास्त काळ टिकत  नाहीत. या वर्षी सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव अन् मुळांची अकार्यक्षमता यामुळे आंबिया बहराच्या मोसंबी फळांची गळ दिसून येत असते. प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया मंदावल्याने वाढत्या फळांना कर्बोदकाचा पुरवठा कमी होत असतो. त्यांच्या कमतरतेमुळे पाने, फुले आणि फळात पेशीक्षय होत असते. फळवाढीसाठी कार्बन- नत्राचे संतुलन असणे फार गरजेचे असते. नत्रामुळे पेशीक्षय क्रिया कमी होत असते.

ऑक्झिनच्या वाढीसाठी नत्राची फार गरज असते. पाण्यातील एकूण नत्रापैकी अमोनिया या संयुगाची मात्रा फळाच्या निरोगी वाढीस पोषक ठरत असते. ही मात्रा शिफारसीत नत्रयुक्त खताच्या फवारणीतून वाढवता येत असते आणि अंबिया बहराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यात संजीवक, बुरशीनाशक व अन्नद्रव्याची फवारणी घेतलेली नसल्यास शिफारशीनुसार वेळेत व मात्रेत त्यांच्या फळे(Sweet Orange)तोडणीपूर्व फवारण्या घेवाय्वाचा असतात. प्रामुख्याने बोट्रिडीप्लोडिया थियोब्रोमी, कोलेटोट्रिकम ग्लोईओस्पोरिऑइड्‍स व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशी देठाद्वारे फळामध्ये प्रवेश करून पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करत असतात.

हे हि वाचा : 5G इंटरनेट सेवा देशभर सुरु होणार; टेलिकॉम मंत्र्यांची घोषणा

या बुरशीचा प्रसार झाडावरील जुन्या वाळलेल्या फांद्यामुळे(Sweet Orange) होत असते. तसेच काही किडीच्या प्रादुर्भावामुळे (उदा. काळीमाशी, मावा इ.) पानावर शर्करायुक्त चिकट पदार्थांवर बुरशी वाढत असते. परिणामी, पेशीक्षय होतो आणि एखाद्या झाडावर १० टक्के वाळलेल्या फांद्या असल्यास त्यावर २२ टक्क्यांपर्यंत फळगळ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः संततधार पाऊस असलेल्या स्थितीमध्ये कोलेटोट्रीकम बुरशींचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत असतो आणि देठ पिवळे पडणे आणि देठाजवळ काळा डाग पडणे यावर उपाय योजताना कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी लागत असते.

फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास खालील बाजूची फळे (Sweet Orange)अगोदर सडण्यास सुरुवात होत असते. त्यावर उपाय योजताना मेटॅलॅक्सिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी लागत असते. खरीप हंगामातील सद्यःस्थितीतील कीड व रोग नियंत्रण याविषयावर डॉ. धांडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

2 thoughts on “Sweet Orange : फळगळीचे नेमके कारण ओळखून उपाययोजना करा 2022”

Leave a Comment