Rain Update : आजचा हवामान अंदाज कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला चला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही हवामान खातानी वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येत आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता आणि मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे
आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरू
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी हि आज शुक्रवार मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पावसाची सुरु झाला आहे.
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला येत आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.