पावसाळ्यात शेळ्यांना होते ‘या’ गवताची विषबाधा 2022 - डिजिटल शेतकरी

पावसाळ्यात शेळ्यांना होते ‘या’ गवताची विषबाधा 2022

पावसाळ्यात शेळ्यांना जनावरांना चरायला (grazing) घेऊन जाताना, मोकळ्या कुरणामध्ये चरताना जनावरांना विषबाधा होण्याची दाट शक्यता होत असते. पावसाळ्यात शेळ्यांना विशेषकरून पावसाळ्यात जनावरांच्या खाण्यात घाणेरीसारखी वनस्पती आल्याने, त्यांना विषबाधा (Poisoning) हि  होत असते आणि विषबाधा झाल्याने जनावरांच्या यकृताला बाधा होऊन, कावीळसारख्या आजारांची बाधा हि  होत असते.

पावसाळ्यात सर्वत्र गवतवर्गीय वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. चराऊ कुरणामध्ये घाणेरी, गुणगुणी या नावानी ओळखल्या जाणाऱ्या विषारी वनस्पती प्रामुख्याने आढळून येत असतात. आणि चुकून जरी या वनस्पती जनावरांच्या खाण्यात आल्या तर त्यांना विषबाधा होण्याची दाट  शक्यता असते.

घाणेरीतील लेंटाडीन नावाचा विषारी घटक ही वनस्पती खाल्ल्यानंतर जनावरांच्या रक्तामध्ये येत असते. आणि असे जनावर सूर्यप्रकाशात आल्यास त्यांना विषबाधेची लागण होत असते. या प्रकारच्या विषबाधेस प्रकाशसंवेदनशीलता असेही म्हटले जात आहे.

यामध्ये जनावरांच्या त्वचेचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येत असतो. त्या भागाला सूज येते आणि  त्या भागाला खाज सुटायला लागते. परिणामी जनावर झाडाला किंवा भिंतीला शरीर घासत असतात. डोळ्याच्या बाजूचा भाग, कान, नाक आणि शेपटीला सूज आलेली दिसून येत असते.जनावरांच्या डोळ्यातील श्लेष्मपटलाचा रंग पिवळा पडत असतो . आणि जनावरांना पिवळ्या गडद पिवळ्या रंगाची लघवी येत असते. बाधा झालेल्या जनावराला ताप येत असतो. जनावरांचे खाणे-पिणे कमी किंवा बंद झाल्याने, पोटाची हालचाल मंदावते आणि  शरीराला खाज सुटत असल्याने, शरीराचा जो भाग सतत घासला जातो, तेथील कातडी निघून जात असते. विषबाधेची तीव्रता जास्त असल्यास, जनावर दगावण्याचीही शक्यता हि फार असते. पावसाळ्यात जनावरांमध्ये घाणेरी वनस्पतीची विषबाधा झाल्याचे प्रकार आढळून येत असतात.

हे हि वाचा :लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण 2022

 

हे हि वाचा : पावसाळ्यात जनावरांच्या आजारांची लक्षणे 2022

 

यावर उपाय म्हणून, जनावरांमध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसून येत असल्यास, अशी जनावरे सूर्यप्रकाशापासून दूर, दाट सावलीमध्ये ठेवली जात असतात. त्यामुळे जनावरांची सूज आणि खाज सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाधित जनावरांवर उपचार करून, ही जनावरे सावलीमध्येच बांधण्यात यावी आणि औषधोपचार करून बाधित जनावरे सावलीमध्ये ठेवावीत. योग्य आणि वेळेत उपचार केल्यास जनावरे लवकर बरी होण्यास मदत होत असते. पावसाळ्यात घाणेरी वनस्पती खाल्ल्याने मेंढ्या व बैल वर्गीय जनावरांमध्ये घाणेरीची विषबाधा आढळून येत असतात.

Leave a Comment