UIDAI : घर बसल्या कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक 2022 - डिजिटल शेतकरी

UIDAI : घर बसल्या कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक 2022

मोबाईल नंबरशिवाय कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक, जाणून घ्या ४ सोप्या स्टेप्स

Aadhaar card correction without mobile number: UIDAI च्या माध्यमातून आधार कार्ड दिले जात असते. UIDAI म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे आणि आधार कार्डवर १२ अंकांचा यूनिक कोड असतो आणि त्याला आधार नंबर म्हटले जात असते. आता आधार हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि इतकेच नव्हे भारतीय नागरिक असल्याचा तो पुरावाही आहे. त्यामुळे त्याच्यावरील एक चूक आपल्याला भविष्यात महागात पडू शकत असते.

आधार कार्डवरील एखादी चूक सुधारायची आहे, परंतु ज्यांच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नाही तसेच अशावेळी काय करायचं हे आज आपण जाणून घेऊया. हे काम तुम्हाला ऑफलाईन करावं लागेल, कारण तुमच्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर नाही आहे.

चार सोप्या स्टेप्स

आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जा आणि आधार कार्ड करेक्शन फॉर्म घ्या

फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा तो पुन्हा तपासा आणि त्याच्यासोबत आधार कार्डाच्या झेरॉक्स कॉपीसह पॅन कार्ड किंवा अन्य आयडेंटिटी कार्डची झेरॉक्स कॉपी जोडा

आधार केंद्रावर लागलेल्या बायोमॅट्रिक मशीनवर स्वतःचं वेरिफिकेशन करून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला अंगठ्याचं निशाण, रेटिना स्कॅन करावं लागनार आहे.

आधार केंद्रावरील संचालक तुम्हाला एक पावती देईल आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर २-३ दिवसांत आधार कार्डाशी लिंक होईल

ऑफलाईन तुम्हा कोणकोणत्या सुधारणा करू शकता?

नाव

पत्ता

जन्मतारिख

लिंग

मोबाईल नंबर

ई मेल आयडी

ऑनलाईन सुधारणा कशी करता येईल?

एकदा का तुमचा मोबाईल आधार कार्डाशी लिंक झाला, तर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन सुधारणा करता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्हाला हवी ती सुधारणा करता येणार आहे.

हे हि पहा : जनावरांतील ब्रुसेलोसिस वाढतोय हा आजा पहा कसा नियंत्रण कराल हा आजार

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

 

3 thoughts on “UIDAI : घर बसल्या कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक 2022”

Leave a Comment