Weather Update ; विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पाऊस शक्य 2022 - डिजिटल शेतकरी

Weather Update ; विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पाऊस शक्य 2022

पुणे : Weather Update बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान (Favorable Climate Condition For Rain) होत आहे आणि  आज (ता. १५) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Heavy Rain Orange Alert) देण्यात येत आहे. तर विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली जात आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र ते ईशान्य बंगाल उपसागरापर्यंत कायम राहत आहे. मॉन्सूनच्या आसाचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीत तर पूर्व भाग दक्षिणेकडे राहण्याची शक्यता वर्तविली आहे. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात ढगांनी दाटी केली आहे आणि  कोकण, मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. १५) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात येत आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तविली  आहे.

कमी दाब क्षेत्र झाले तीव्र

उत्तर बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत शनिवारी (ता. १३) तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता. १४) आणखी तीव्र झाले दिसत आहे. पश्चिमेकडे असणारी ही तीव्र कमी दाब प्रणाली (डिप्रेशन) पश्चिम बंगालच्या दिघापासून १० किलोमीटर आग्नेयेकडे, तर ओडिशाच्या बालासोरपासून पूर्वेकडे ९० किलोमीटर समुद्रात आहे आणि तर अग्नेय अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर दिला आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

छत्रपती संभाजीनगर , जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली दिला आहे.

हे हि वाचा : घर बसल्या कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment