हा ब्रुसेलाच्या विविध प्रजातीमुळे होणारा सांसर्गिक जिवाणूजन्य आजार आहे आणि हा आजार प्रामुख्याने गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी आणि श्वान यांच्यामध्ये संक्रमित होत असतो.
ब्रुसेलोसिस (brucellosis) म्हणजेच सांसर्गिक गर्भपात होय . हा ब्रुसेलाच्या विविध प्रजातीमुळे होणारा सांसर्गिक जिवाणूजन्य आजार आहे आणि हा आजार प्रामुख्याने गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी आणि श्वान यांच्यामध्ये संक्रमित होत असतो. तसेच ब्रुसेलोसिस आजार जनावरांतून माणसामध्ये संक्रमित होतो.
प्रादुर्भावाचा परिणामः
१) गाभण काळाच्या शेवटच्या टप्यात गर्भपात झाल्यामुळे वासरू दगावत असते.
२) बाधित जनावरात दूध उत्पादन घटते. दोन वेतातील अंतर वाढते. बाधित जनावर गाभण राहत नाही. किंवा गाभण राहिल्यास वारंवार गाभडते.
३) प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वांझपणा येऊ शकतो.
४) चाऱ्यावरील खर्च वाढत असतो.
आजाराचा प्रसार :
१) गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या बाधित गर्भ, गर्भाशयाचा स्राव, नाळ, वार यांच्या संपर्कात निरोगी जनावर आल्यास संसर्ग होण्याचा जास्त धोका वाढतो.
२) दूषित चारा, पाणी यातून प्रसार होतो आणि रेतनासाठी वापरलेला वळू, बोकड यांच्या वीर्यातून प्रादुर्भाव होऊ शकतो.
३) संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यावर श्वसनावाटे जिवाणू शरिरात प्रवेश करू शकत आहे.
४) माणसांमध्ये कच्चे मांस, कच्चे दूध सेवन केल्यावर प्रसार होत असतो.
५) जनावरांच्या सतत संपर्कात येणारे पशुतज्ज्ञ, कर्मचारी, प्रयोगशाळेतील काम करणारे व्यक्ती, तसेच व्यावसायिक यांच्यामध्ये आजार संक्रमित होऊ शकत आहे.
जनावरांतील लक्षणे :
१) गाय, म्हशीत ६ ते ८ महिन्यांचा काळ आणि शेळी, मेंढीमध्ये ४ ते ५ महिन्यांच्या गाभण काळात अचानक गर्भपात झालेला दिसून येत असतो.
२) हा सांसर्गिक आजार असल्यामुळे एकाच वेळेस गाभण असलेल्या जनावरांत गर्भपात होऊ शकत आहे.
३) काही गाभण जनावरांत गर्भपात न झाल्यास, प्रसूती व्यवस्थित होते परंतु प्रसूतीनंतर जार अडकणे, गर्भाशयाचा संसर्ग होणे, कासदाह होत असतो.
४) अशक्त वासरू जन्मते अन नर प्राण्यात अंडाकोशावर सूज येत असते. वीर्यात जिवाणूंचा संसर्ग होत असतो.
५) माणसातील लक्षणे ः हलका ताप येणे, थंडी, डोकेदुखी, अंग दुखणे, आळस येणे, भूक न लागणे, वजन कमी होत असते, सांधे दुखणे, पोटामध्ये वेदना होत असणे.
आजाराचे निदान:
१) बाधित जनावराचे रक्त, रक्तजल, गर्भाशयाचा स्त्राव, गर्भाशयाचे अवयव, जार, यापैकी योग्य निदानासाठी प्रयोगशाळेत द्यावे लागत असते.
२) वर्षातून दोनदा प्रौढ जनावरांची रक्तजल तपासणी करत असतात.
नियंत्रण :
१) आजार एकदा कळपात आल्यावर दिर्घकाळ टिकून राहत असतो. गर्भपात झालेल्या जनावरास वेगळे ठेवावे आणि उपचार करावा लागत असते.
२) गर्भपात झालेल्या जनावरांचे गर्भ, जार, स्राव, दूषित चारा दूर खोल खड्डात गोठ्यापासून दूर पुरावा आणि त्यावर चुन्याची पावडर टाकावी.
३) नवीन खरेदी केलेल्या जनावरांची रक्तजल चाचणी करून घावी.
४) कळपात रेतनासाठी वापरलेले वळू, बोकड वारंवार बदलू देऊ नका.
५) बाधित क्षेत्रामध्येच ब्रुसेलोसिस आजाराचे लसीकरण पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने करावे लागत असते.
६) कच्चे दूध सेवन करणे शकतो टाळावे.
७) पशू प्रयोगशाळेत काम करताना योग्य काळजी घेण्यात यावी.
हे हि वाचा : लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण
यासाठी Artificial Insimइनation योग्य आहे, नैसर्गिक क्रॉसिंग टाळlवे, सकस आहार , स्वच्छ पाणी जनावराना द्यावे, नहमी स्वच्छ धुवावे, जनावाराना व्यायाम ठेवावा , दर सहा महिन्याने जंत निर्मूलन करावे, खाद्यामधे मिनरल पावडर वापरावी. गाभन जानवर ची योग्य काळजी घ्यावी, maintenance Ration+pregnancy ration जानवर ला द्यावे , हिरवा चारl कुटी मशीन ने बारीक करुन जानावरणा घालlवा यामुले चार वाया जानार नाहीं, याने जानवर ची rumination करायला energy वाचेल. अजुन भरपूर उपाय आहेत