राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार; हवामान अंदाज पहा कोठे किती पाऊस पडणार आहे
पुणे : हवामान अंदाज मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला येत आहे. त्यानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी यासह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुणे शहरातही ९ ऑगस्टला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा पसरला असून राज्याच्या तिन्ही बाजूंकडून चक्रावात स्थिती निर्माण झाली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा आणखी एक पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. जोडीला अरबी समुद्रावरून पश्चिमी वाऱ्यांचा जोर कायम राहणार आहे. या अनुकूल स्थितीमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे.
राज्यात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यात साडेपाचपर्यंतचा पाऊस (मिमीमध्ये) : वसई ९३, गुहागर व लांजा ८९, धुळे १११, सासवड ८९, देवळा ७५, राहता ६५, पारोळा ६३, आष्टी ११९, हदगाव ७५, मंगरुळपीर ७२, वाशिम ४२ इतका झाला आहे.
पुण्यात मध्यम पाऊस
पुणे शहरात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा, तर मंगळवारी (दि. ९) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्विला आहे. घाट परिसरात दोन दिवस मुसळधार व त्यानंतर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल आणि पुण्यात रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये) : शिवाजीनगर १५.८, लोहगाव ५.८, चिंचवड २, लवळे १, मगरपट्टा ३.५
महाराष्ट्र तील देखील इतर जिल्ह्या मध्ये मध्यम ते मुसळधार पाउसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी जास्त तर काही टिकाणी कमी असा पाऊस पडेल.
हे हि वाचा : गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा गाभण काळातील शेवटचे तीन महिन विताना घ्यावयाची काळजी व्याल्यानंतर घ्यावयाची काळजी