पुणे : पावसाने (Weather Update)उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) चांगलीच वाढ झाली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक भागात विजांसह पावसाने (Rainfall With lightning) पुनरागमन केले आहे आणि आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तर उर्वरित काही भागात राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.
मॉन्सूनचा (Weather Update)आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे आणि अंतर्गत तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आणि त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विजांसह पावसाला पोषक हवामान होत आहे.
पावसाची उघडीप दिल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे आणि यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, (Weather Update)मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे(Weather Update) आणि तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
कोकण : कुडाळ, सावंतवाडी प्रत्येकी १०.
मध्य महाराष्ट्र : कवठे महांकाळ, मालेगाव प्रत्येकी ३०, रावेर १०.
मराठवाडा : उमरगा ४०, धर्माबाद, घनसांगवी, फुलंब्री प्रत्येकी २०, नायगाव खैरगाव, पाथरी, अर्धापूर प्रत्येकी १०.