Tomato pests: मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय योजना करावी 2022 - डिजिटल शेतकरी

Tomato pests: मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय योजना करावी 2022

सध्या मिरची (Chilli), वांगी (Brinjal) आणि टोमॅटो (Tomato) पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत आपण त्या पाहूया.

CHILLY

मिरची पिकातील फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लँनोफिक्स ५ मिली प्रति ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५५  व ७० दिवसांनी फवारनि करावी. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी.

सध्याच्या हवामानामुळे मिरची पिकावर पांढरी माशी व फुलकिडे यांच्यामार्फत चुरडा-मुरडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो काही ठिकाणी झाला आहे. त्यामुळे पिकाची पाने बारीक वाकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी निस्तेज होत असतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटत असते. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे तसेच फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे (Tomato)लावण्यात जावे. रासायनिक कीडनाशकांचा वापर करायचा असल्यास फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फीप्रोनिल (५ % ई सी) १५ मिली किंवा स्पिनोसॅड (४५ ई सी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी..

हे हि वाचा : मिरचीवरील रोगनियंत्रण

मागच्या(Tomato) आठवड्यात अनेक ठिकाणी असलेले ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच पुढील हवामानाची स्थिती टोमॅटो पिकावरील जीवाणूजन्य करपा रोगास अनुकूल असते आणि  व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब (७५ डब्लू.पी) २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (५० डब्लू.पी) २५ ग्रॅम यापैकी कोणतेही एक कीडनाशक १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघड दिल्यास फवारणी करावी…

वांगी

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वांगी पिकामध्ये सुरवातीला ५ ते ६  % निंबोळी अर्काची फवारणी कोरड्या हवामानात करण्यात यावी. पिकामध्ये पहिली निंदणी करावी आणि  पीक तण विरहित ठेवावे. ढगाळ वातावरणामुळे फुलकिडे आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारनि करावी.

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “Tomato pests: मिरची, वांगी, टोमॅटोवरील किडींसाठी काय उपाय योजना करावी 2022”

Leave a Comment