Weather Update आज शनिवार (ता. १०) दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
बंगालच्या(Weather Update) उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, राज्यात असलेला कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Zone) यामुळे राज्यात विजा, मेघगर्जना, विजांसह पाऊस (Rain In Maharashtra) ठीक ठीकाणी पडत आहे. आज (ता. १०) दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) (Weather Update) देण्यात आला आहे तसेच तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला गेला आहे.
मॉन्सूनचा (monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, हा पट्टा जैसलमेर, उदयपूर, जळगाव, रामगुंडम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाला आहे. दक्षिण कोकणापासून उपसागरातील कमी दाब प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम राहत आहे.
सकाळपासून(Weather Update) वाढलेला उन्हाचा (Heat) चटका, उकाडा, दुपारनंतर वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पडणारा पाऊस असेच चित्र राज्याच्या विविध भागात दिसत आहे आणि आज (ता. १०) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात येत / आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, आजपर्यंत (ता. १०) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत तसेच ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले गेला आहेत.
हे हि वाचा : नव्या कापसाला मिळतोय चांगला १२ हजाराचा दर
1 thought on “Weather Update : राज्यात विजांसह पावसाची शक्यता 2022”